पानोली गाव ठरतंय ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गासाठी आशेचा किरण.!
पारनेर (प्रतिनिधी) : पारनेर तालुक्यातील पानोली गाव हे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पुरोगामी विचारसरनी असणार गाव म्हणून ओळखल जात. एके काळी कम्युनिस्ट पक्षाचा जबरदस्त प्रभाव असणार हे गाव आज मात्र आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर राज्याच लक्ष वेधण्यात यशस्वी ठरत आहे.
ग्रामीण भाग म्हटलं की, तिथे खेळासाठी सुविधा नसतात, त्यामुळे ग्रामीण खेळाडूंची खूप मोठी अडचण निर्माण होते. शिवाय आपल्याकडे क्रिकेट सोडून इतर खेळ ही असतात, हे पचनी पडत नाही त्यामुळे अनेक खेळाकडे दुर्लक्ष होत. हीच गरज लक्षात घेऊन पानोली ग्रामस्थ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ह्या विद्यालयाच्या शिक्षकांच्या पाठपुराव्याला यश आलं असून पानोली आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील धावपट्टू साठी २०० मीटरची धावपट्टी जिल्हा क्रीडा विभागामार्फत मंजूर झाली असून त्याचे उदघाटन ही ग्रामस्थ मंडळी पानोलीच्या उपस्थितीत पार पडले आहे.
ह्या अगोदर ही पानोली मध्ये असणारी अद्ययावत शाळा, पानोलीच पाणलोटासाठी असणार काम हे राज्यभरात चर्चेत असून आदर्श गाव राळेगणसिद्धीच्या बाजूला असणार पानोली हे गाव ही एक आदर्श गाव म्हणून राज्यात नावारूपाला येत असल्याचे बोलले जात आहे.