राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित
Contents
hide
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : केंद्र शासनमार्फत देण्यात येणारे युवा व क्रीडा मंत्रालयमार्फत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम आझाद करंडक पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित केले आहे.
पुरस्कारासाठी पात्र खेळाडू, प्रशिक्षक, संस्था, विद्यापीठ यांच्या कडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज dbtyas-sports.gov.in संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्जाची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानंतर अर्ज स्विकारण्यात येणार नाही, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.