जगात पर्मनंट अस काही नाही..!
काही वर्षापूर्वी काही वस्तुंना इतकी डिमांड होती की, घरामधली जेष्ठ मंडळी सकाळी उठल्यावर, कुणी ही दरवाजा वरील बेल वाजवली नाही, तरी ही दरवाजा किमान चार ते पाच मिनिटं झालं की उघडून पाहणार. मग हा उघड बंदचा खेळ चालू असताना घरातून महिला वर्ग आवाज देणार.
आहो..! दूध आलं असेल तेवढं घ्या
बरं…..! हो हो..!त्याच साठी तर दरवाजा उघडून पहात असतो सकाळी. दूध वाल्याने दूध टाकलं का नाही ते म्हणून…!
इकडुन इतका प्रेमळ प्रतिसाद पाहुन. महिला मंडळ भलतच खुश …! हसत एक नजर आरशा कडे टाकत थोडं लाजत स्वतःला न्याहाळत लडिवाळ स्वरात.
“आता चहा ठेवते “मला माहित आहे तुम्हाला सकाळ सकाळ चहा हवा….!
” हो… हो…! म्हणत हे बहाद्दर पुन्हा दरवाजा उघडून इकडे तिकडे नजर फिरवत ..! तोंडातल्या तोंडात सकाळ सकाळ देवाच नाव घायच, तर हे मात्र उगाच सकाळ सकाळ शिव्या इतक्यात कुणी तरी येणारा जाणारा हातात वर्तमानपत्र घेऊन येताना दिसला की इकडं ह्याचा जीव पूर्ण कासावीस होत असे.
मग कधी तरी हा, सहज दरवाजा उघडून थेट बाहेर जात असे, मग मात्र लांबून सायकलवर येणारा मद्रासी अण्णाच पोरग दिसलं की हा गालात हसत जरी असला तरी तो अण्णा जवळ आला की गंभीर होत त्याच्यावर जोरात खेकसत असे….
“तेरा रोज का नाटक है ! तेरे को मालूम है ना ! मेरे को सुबह पेपर जलदी मांगता है ! त्या पोराला अस म्हणत मनात परत काहीतरी पुटपुटत त्याच्या कडून पेपर अक्षरशः हिसकावून घेतला जात असे…
अण्णा ही बारा गावच पाणी पिलेला असल्यामुळे सायकलवर टांग टाकली की हमखास म्हणायचं
क्या साहब ! सुना था सुबह को
तंबाखू नही खायेगा तो, होता हीच नही ! पर तुम क्या पेपर पढता है क्या संडास मे जा के..!
अस म्हणत तो जोरदार हसत निघून ही जात असे.
आज मात्र प्रिंट मीडिया जवळ जवळ नामशेष झालाय.पूर्वी इमारतीच्या जवळजवळ अर्ध्या पेक्ष्या जास्त घरांच्या दारावर वर्तमान पत्र दरवाजाला सकाळी सकाळी लटकलेल दिसायच आज चुकून एखाद्या घरात वृद्ध व्यक्ती रहात असेल तर त्या घराच्या दरवाजा वर वर्तमान पत्र दिसत.चहा आणि वर्तमानपत्र ह्यां दोघांचा मिसळून गेलेल्या वासाची लागलेली सवय जणू वेगळी नशा होती. आज खिडकी पुसायला ही पेपर नाही……!
खर तर शाश्वत अस ह्या जगात काहीच नाही नाही का? मग ते वर्तमान पत्र असू देत अथवा माणूस ज्याचा त्याचा एक काळ असतो त्या काळात जगून घेता आल पाहिजे नाहीतर अडगळीत पडतो ,ते ही उगाच गत वैभवआठवत आणखी दुःख सहन करत.!
– अशोक पवार
ReplyForward |
क्या बात है
या संवादावरून व्यक्ती आणि वल्लीतील नारायण कथा आठवली
खूप छान.. पर्मनंट असे काही नाही