महिला व बाल समुपदेशन केंद्राचा उदघाटन समारंभ
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ रोजी दिव्य सदन सोशल सेंटर वडाळी, अमरावती या सेवाभावी संस्थे मध्ये महिला व बाल कल्याण विभाग अमरावती महानगरपालिका अमरावती द्वारा अनुदानित व दिव्य सदन सोशल सेंटर द्वारा संचालित महिला व बाल समुपदेशन केंद्राचा उदघाटन समारंभ पार पडला.
उदघाटन समारंभाला उदघाटक म्हणून मा. देविदास पवार साहेब (म.न.पा आयुक्त अमरावती.) हे उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा.योगेश पीठे सर (सहा. आयुक्त पूर्व झोन क्रमांक ३) प्रामुख्याने हजर होते. तसेच नरेंद्र वानखडे सर. (महिला व बाल विकास अधिकारी, म.न.पा अमरावती.) तसेच मा. गोरखनाथ जाधव सर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा, पोलीस स्टेशन) हे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान संस्थेमध्ये नव्याने सुरु होत असलेल्या समुपदेशन केंद्राचे फीत कापून मा. आयुक्त साहेबांनी उदघाटन केले. व दीपप्रज्वलन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
दिव्य सदन सोशल सेंटर च्या संचालिका मा. सिस्टर रोजलीन यांनी संस्थेच्या ४९ वर्षांच्या कार्यांवर चित्रफितीच्या माध्यमातून प्रकाश टाकला व संस्थेच्या सेवाभावी कार्यांना मान्यवरांसमोर सादर केले. सोबतच संस्थेच्या आगामी कार्यांबद्दल मा. आयुक्त यांना माहिती देण्यात आली. संस्थेच्या कामाबद्दल मा. आयुक्त व सर्व उपस्थितांनी स्तुती सुमने वाहिली. सोबतच दिव्य सदन मध्ये गतकाळात आपले योगदान दिलेल्या सिस्टरांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या मध्ये सत्कारमूर्ती मा. सिस्टर लिली थॉमस, सिस्टर कॅथ्रिन के एस, मा. सिस्टर सलिना पॉल आणि मा दिगंबर तायडे सर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालक सौ. आम्रपाली बडगे मॅडम यांनी केले असून आभार प्रदर्शन मा. सिस्टर जोसना यांनी केले. व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्यसदन च्या संपूर्णकर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.