कोजागिरी पौर्णिमा…
कोजागिरीचा चंद्रमा
मोठ्या गोल आकाराचा !
त्याचे रूप बघून
आनंद घ्यायचा..
शरद पौर्णिमेला
सारे एकत्र जमतात !
घरोघरी वा समूहाने
दुध,बासुंदी करतात..
दूध आटवता आटवता
मग मध्यरात्र होते !
अन् मध्यरात्रीला
जणू लक्ष्मी सरस्वती येते..
कोण कोण आहे जागी
लक्ष्मी सरस्वती बघते !
कोजागिरीच्या शुभेच्छा देत
घरोघरी अंगणी फिरते…
-अनिल दाभाडे
रसायनी
ReplyForward |