माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनीं घेतले शासकीय रुग्णालयात उपचार
* सामान्य जनतेसाठी प्रेरणादायी
धारणी(प्रतिनिधी) :सध्या जनतेचे शासकीय आरोग्य विभागाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जात असून विश्वास कमी होत असला तरी भारतीय जनता पक्षाचे मेळघाट विधान सभा माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी चक्क तीन दिवस धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्याने हि बाब सामान्य जनतेसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
चार दिवसाअगोदर अचानक माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांना ताप, सर्दी , खोकला आदींचे परिणाम आले. या परिस्थितीत भिलावेकर यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालय गाठले, वैद्यकीय अधिकारी यांनी भरती होण्याचा सल्ला दिला असता कोणत्याही प्रकारचा विचार न करता भरती होऊन तब्बल दिन दिवस उपचार घेतला. सध्या प्रकृती ठीक असून सामान्य जनतेने शासकीय आरोग्य विभागात उपचार घेण्याचा हा अप्रत्यक्ष पणे सल्लाच असल्याचे दिसून येते.
शांत व कोणतेही डावपेच नसलेले माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांना डॉक्टरांनी सध्या आरामी करण्याचा सल्ल्या दिला आहे. शासकीय रुग्णालयात उपचार घेणे, या मागे माझा कोणताही राजकीय हेतू नसल्याचे सांगत अधिक प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले.