मराठ्यांनो तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार…!
आरक्षण का ? आणि कश्यासाठी ? गरजेचं आहे. हे ज्यावेळी तुम्ही ग्रामीण भागात फिरला, की नक्कीच समजेल आणि लक्षात ही येईल की ह्या जरांगे पाटील यांच्या सभांना गर्दी का होते ते. आहो! मराठा समाजातील कितीतरी लोक अशी आहेत, की ज्यांना घर बांधायला देखील जागा नाही. फक्त नावाला पाटील उरलेत.
जमिनीची विभागणी होऊन शेकडो एकर जमीन असणारे देशमुख पाटील , जहागिरदार आता फक्त इतिहास आठवून गत वैभव आठवत आहेत. त्यात आज ग्रामीण भागात ही बहुतेक शेतमजूर हे मराठा आहेत. हे वास्तव आहे .जे शेतात काम करून आपलं जीवन जगत असतात. ज्या वेळी गावातील इतर समाजातील मुलं केवळ आरक्षण आहे म्हणून शिकतात ही आणि त्यांना नोकऱ्या ही लागतात .परंतु त्यांच्याच बरोबरीची आमची मराठा पोर. स्वतःच्या नशिबाला दोष देत आपलं जगणं जगत असतात. आणि मागील पिढीला दोष ही देत असतात आम्ही काय गुन्हा केला. मराठा समाजात जन्म घेणे हा आमचा अपराध आहे का ? हा विचार त्यांना हेलावून सोडतोय.
आपल्यावर अन्याय होतोय हे माहीतआहे परंतु आपण काही करू शकत नाही. ही चीड मात्र त्याला आतून बाहेरून अंतर्मुख करून सोडते. आजवर ज्या मराठा नेतेमंडळी व, संघटना, आपल्या जीवावर मोठ्या झाल्या शिवाय आपण ज्यांच्याकडे राजे म्हणून पाहतो ,ती मंडळी ही आज आरक्षण ह्या मुद्यावर कुणीच बोलत नाही. फक्त कोर्टा कडे बोट दाखवून सगळे मोकळे होतात.
एकटा जरांगे पाटील मात्र लढतोय आणि त्याच्या पाठी सर्वसामान्य मराठा उभा आहे. आज काही नेते मंडळी त्यांच्यावर ही टीका करत आहेत. त्यांना माझं एकच म्हणणं आहे जरांगे पाटील सर्वसामान्य असून त्यांचालढा हा सर्वसामान्य मराठ्यांसाठी आहे. म्हणून तर त्यांच्या सभांना गर्दी होते. हे पाहून अनेक मराठा नेत्याचं राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकत म्हणून हे इतर नेते जरांगे वर केवळ त्यांच्या सांगण्यावरून टीका करत आहेत.
मराठयांनो आजवर अनेक नेते ,त्यांची आश्वासन आपण एकूण घेतली , मोठं मोठे मोर्चे काढले . पण शेवटी सर्वांनी झुलवल आणि फक्त भुलवल. त्यामुळे राजकीय नेतृत्वावरचा विश्वास उडाला आहे. जर आरक्षण घ्यायचं असेल तर तुला स्वतःला ह्या लढ्यात उडी घ्यावी लागेल. कायदेशीर जी आंदोलन आहेत ती करावी तर लागतील. परंतु आजवर ह्या हरामखोर नेतेमंडळीनि केवळ भूल थापा दिल्या त्यांचा वचपा काढायचा असेल तर स्वतः मैदानात उतरून निवडणूक रणसंग्रामात सहभागी होऊन नेमकी आपली ताकत किती ? आणि कशी आहे? हे एकदा दाखवल की सगळे जागे होतील.
फक्त त्याना जाग होण्या अगोदर तू जागा हो…? अरे मराठा आहेस ना तू ! चल तर मग आपली लढाई आपण लढू . आपल्या हाताच्या बोटाने जे निवडणुक यंत्रात आपल्या उमेदवाराच्या चिन्हासमोरच बोट दाबल जाईल ना! त्याचा अभिमान पाच वर्षे असेल. शिवाय जाब विचारण्याची ताकत ही असेल तर मग ठरवा आपण मागत रहायच की आपणच आपल्या समाजाला दयायच ते…..!
-अशोक पवार