जरांगे पाटील, कुणाच्या मताला लावणार सुरुंग ?
जरांगे पाटील यांची न भूतो न भविष्यती अशी विराट सभा काल झाली . तिचे हादरे एवढे भयानक होते की दिल्लीत असणारे भाजप नेते आणि राज्यातील सत्ताधारीघटक पक्ष पूर्णतः हादरून गेले आहेत. जर आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं नाही, तर हा समाज आपली सगळी ताकत आपल्या संघटने पाठी उभी करून निवडणुकीत उतरून राज्यात भाजप च्या स्वप्नांना सुरुंग लावू शकतो. भाजप ला राज्याच्या सत्तेच काही देणं घेणं नाही. परंतु लोकसभेत भाजप मित्रपक्ष मिळून जो ४० च्या वर आकडा गृहीत धरला जातोय तो आकडा जरांगे पाटील यांच्या मुळे खूप खाली येऊ शकतो.हे दिल्ली तील भाजप श्रेष्ठी यांच्या कानावर गेलं आहे.
इतकी मोठी विराट सभा घेऊन पाटील यांनी राज्यातील मराठा नेते आणि मराठा संघटना यांना आरोपीच्या पिंजऱ्यात न बोलता उभं केलं आहे. त्या मुळे मराठा समाज मराठा नेते आणि संघटना यांना कंटाळून सर्व सामान्य मराठा जनतेचा जरांगे पाटील यांच्या वर विश्वास बसला असून आपल्यातील माणूस आपलं नेतृत्व करत असेल तर आपल्या समस्या आणि त्याला आपण सहज भेटू शकतो. ही धारणा असल्या मुळे मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबतच जाणार हे ठाम आहे. त्या मुळे जर आरक्षण रखडल तर अनेक मराठा नेते मग ते सत्ताधारी मित्रपक्ष आणि भाजप यांचे असो ते पक्ष सोडतील काही दिगग्ज ,निवडणूक लढणार नाहीत , हा अंदाज नसून , अनेक नेत्यांनी तस खाजगीत बोलून ही दाखवलं आहे. कारण मराठा समाज एकण्याच्या अजिबात मनस्थितीत नाही.
ह्यात जर फायदा होणार असेल तर तो मनसेला होणार मनसेने ही आपली यंत्रणा सज्ज केली असून मराठा बहुल मतदान असणारे मतदार संघ तेथील राजकीय गणित जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज ठाकरे यांच्या सभा आणि आजवर सर्वांना सत्ता दिली मला द्या हे उदगार त्यांना सत्ता देऊ अथवा न देऊ पण भाजप आणि मित्रपक्ष यांची डोके दुःखी वाढवणार. जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांचा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात डबल अटॅक सुरू झाल्यावर भाजपा साठी इतकं काही सोपं नसणार . त्यात पवार साहेब यांनी अजून स्पष्ट केलं जरी नसलं तरी ते आघाडी कडूनच लढणार अस तरी तूर्तास वाटत आहे. काही ही म्हणा परंतु जरांगे पाटील यांनी मात्र हवा बदलवली.
-अशोक पवार
गटेवाडी पारनेर नगर,
8369117148
अशोकराव
खूपच छान मांडणी केली आहे..
तथापि, मागील काही नेतृत्वांचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, या तथाकथित नेतृत्वांनी स्वतःचे हित पाहून आपली भाकरी तापल्या तव्यावर भाजून घेतली आहे. हे निर्विवाद सत्य आहे. मराठा समाज हल्ली संभ्रमित झाला आहे.. धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशी स्थिती आहे. आणि त्यात जरांगे पाटील यांनी राज्यासह दिल्लीला घाम फोडला आहे… मराठा समाज आज जरांगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे.. फक्त समाजाचा भ्रमनिराश व्हायला नको.. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वसामान्य माणसांची ईच्छा आहे.. आणि तो अधिकार आहे. पण फक्त गाजराची पुंगी वाजायला नको एवढीच अपेक्षा..