गाव
Contents
hide
शांतता गावातली होते हमेशा भंग आता…
राहिला ना फारसा गावात माझ्या ढंग आता…
लागली आबालवृद्धांना नशेची सवय येथे ,
नेहमी व्यसनात असते गाव माझे दंग आता…
फडकणारे सांगती झेंडे घरांच्या धर्म जाती ,
घेतले आपापले वाटून आम्ही रंग आता…
चालतांना बोलतांना ,तू नको गाफील राहू ,
नेम नाही गाव हे होईल केव्हा तंग आता…
प्रश्न ‘आ’वासून गावाला गिळाया लागलेले ,
गावही दररोज लढते जिंदगीची जंग आता…
-संदीप वाकोडे