नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, ओजस देवतळेची ‘सुवर्ण’ कामगिरी
नागपूरच्या ओजस देवतळेनं आशियाई गेम्समध्ये तिसरं सुवर्णपदक जिंकलं आहे. ओजसनं तिसरं सुवर्ण पदक जिंकून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळेनं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड या प्रकारात अंतिम सामना खेळत गोल्ड मेडल जिंकलं आहे. ओजसनं आशियाई गेम्समध्ये तीन गोल्ड मेडल मिळवत इतिहास घडवला आहे. नागपूरच्या ओजस देवतळे यानं आर्चरी मिक्स टीम कपांऊंड इव्हेंटमध्ये ही भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. ओजस जगातील तिरंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला आंतरराष्ट्रीय तिरंदाज आहे
ओजस देवतळेनं आशियाई गेम्समध्ये सुवर्ण पदकाची हॅटट्रीक साधल्यानं नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ओजसनं आशियाई गेम्समध्ये तीन सुवर्ण पदकाची कमाई करत हॅटट्रीक केली आहे. त्यामुळे नागपूरकरांनी शहरात मोठा जल्लोष साजरा केला आहे. ओजस देवतळेनं सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. ओजस हा आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच नागपूरकर ठरला आहे.
आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळेनं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड या प्रकारातील अंतिम सामन्यात गोल्ड मेडल जिंकलं आहे. ओजसनं आशियाई गेम्समध्ये तीन गोल्ड मेडल मिळवत इतिहास घडवला आहे. ओजसनं आज सुवर्ण वेध घेताचं नागपुरात इतिहास घडला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत मेडल जिंकणारा ओजस हा नागपूरचा एकमेव खेळाडू ठरला आहे.
ओजस देवतळेचा संघर्षमय प्रवास
ओजसने विपरीत परिस्थितीमध्ये मोठी झेप घेतली. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात आर्चरी म्हणजेच तिरंदाजी खेळासाठी अनुकूल वातावरण आणि सुविधाही नाहीत मात्र तेजस सारख्या खेळाडूने जिद्द आणि चिकाटी या बळावर इथपर्यंत मजल मारली आहे.काही दिवसांपूर्वी त्याने जर्मनी व फ्रान्समध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतही देशासाठी विश्वविक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यावेळी त्याने जगातील नंबर वन तिरंदाज व मिस्टर परफेक्ट समजल्या जाणाऱ्या नेदरलँडच्या माईक स्लॉसरसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना हरवले होते. तब्बल 92 वर्षाच्या इतिहासात भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच सुवर्ण जिंकले होते.
– प्रा डॉ सुधीर अग्रवाल
९५६१५९४३०६