* पाठ्यपुस्तक परिसरातील बिबटयाला तात्काळ जेरबंद करा
* आ. सौ. सुलभाताई खोडके यांचा वनविभागाला अल्टीमेटम
* वन्यजीव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची केली सूचना
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी): स्थानिक व्हीएमव्ही लगतच्या पाठ्यपुस्तक मंडळ परिसरातील रहिवासी भागात बिबटयाने संचार केल्याचे स्एथानिक नागरिकांना दिसून आले तसेच बिबट्कायाने संचार केल्याचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाल्याने परिसरात एकच खळबळ व दहशत निर्माण झाली आहे. सदर प्रकरणी आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाठयपुस्तक परिसरात पाहणी करून बिबटयाला जेरबंद करण्यात यावे, तसेच स्थानिकांच्या सुरक्षेला घेऊन उपाययोजना करण्याची सूचना केली.
यावेळी आ. सौ सुलभाताई खोडके यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत परिसरात पाहणी केली. परिसरात बिबट्याने शिरकाव केला असल्याबाबतचे निरीक्षण वन विभागाने नोंदविले असल्याने या भागात बिबट्या संचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर भागात मोठ्या प्रमाणात रहिवाशी क्षेत्र आहे. तसेच शाळा -महाविद्यालीय विद्यार्थ्यांची वर्दळ सुद्धा या भागात दिसून येते. त्यामुळे वन्य जीव विरुद्ध मानवी संघर्ष अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे बिबटयाला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू पथक सज्ज ठेवा, सदर परीक्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावण्यात यावे, नागरिकांसाठी तूर्तास प्रतिबंधक क्षेत्र म्हणून सूचना फलक लावण्यात यावे,
रेस्क्यू पथकाने करडी नजर ठेवून बिबटयाचा शोध घ्यावा, जागोजागी पिंजरे लावून बिबटयाला कैद करण्यासाठी सापळा रचावा, अशा विविध उपाययोजना करण्याची सूचना आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच नागरिकांनी भीती न बाळगता दक्षता व सतर्क राहण्याचे आवाहन केले. यावेळी वडाळी वनपरिक्षेत्रीय अधिकारी पी. टी . वानखडे, यश खोडके तसेच वनविभागाचे अधिकारी व स्थानिक स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.