महागडे फोन घेताना नेमका कोणता विचार कराल?
आयफोन किंवा मग सॅमसंग, 60 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचाफोन विकत घेतल्याने नेमका कोणता जगावेगळा स्टेटस मध्ये फरक येतो?
काही महिन्यांपूर्वी एका गावात एका पोराने घरचे IPhone घेऊन देत नाहीत, म्हणून आत्महत्या केली. विषेश म्हणजे मुलाचे आईवडील गवंडी काम करतात, पण पोराने आईबापाजवळ नुसता नाद लावला होता आय फोन पाहिजे. शेवटी आई बापाने पोराच्या हट्टापुढे हात टेकले आणि वडिलांनी दुकानात जाऊन आय फोन घ्यायच ठरवल पण पोराला पाहिजे तो कलर तिथे नव्हता. आणि हट्ट मात्र काही केल्या कमी करत नव्हता .म्हणून बापाने सरप्राइज द्यायच ठरवल होत, व ते जेव्हा दुपारी घरी आले तोपर्यंत मुलाने मोबाईल घेऊन देत नाही म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आणि विषेश म्हणजे पोरग पण काही लहान नव्हत महाविद्यालयात शिकत होत.
दुसर ही असच एक पोरग पाहिलं. कॉलेजच राहणीमान अस होत कि बास विचारु नका आणि त्याने खिशातून आयफोन काढला एक मिनिटासाठी पोर म्हणले ह्याने चोरून आणला असेल फोनमग थोडी चौकशी केल्या नंतर कळल की त्या पोराचे आईबाप पण साधच काम करतात.
गावात शहरात असे बरेच पोर आहेत जे आयफोन विकत घेतात आणि खास फोनचे हप्ते भरण्यासाठी कामाला जातात बर हा फोन हप्त्यांवर परवडत नाही बर का 16% व्याज हा आकडा ऐकायला जरी कमी वाटत असला तरी जवळपास फोनच्या किंमतीपेक्षा 10 ते 12 हजार रुपये वरती जातात. 60/70,000 हजारची जर गोष्ट घ्यायची असेल तर एकतर निट पाहिल तर महिन्याला एक लाख पाहिजे नाही तर मग कमीत कमी 50,000 रुपये तरी पाहिजे म्हणजे एवढी झळ तुम्हाला बसणार नाही आणि लय किडा वळवळ करत असेल तर मग 30,000 हजार तरी पाहिजे ह्यापेक्षा कमी पगार असणाऱ्या लोकांनी आयफोन कडे जाण्याचा निर्णय घेऊ नये
कारण दिखाव्याच्या नादात जाणारे बऱ्याचदा मूर्ख ठरतात…