* २८८विधानसभा क्षेत्रातील अनेक विद्यमान आमदारांना …माजी आमदार ..…. अशी पाटी लावण्याची वेळ जवळ आलेली आहे…!*
* खुपिया ऐजंन्सीचा धक्कादायक सर्व्हे –
* शिवसेना (उबाठा)+काँग्रेस+राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)सत्ता येण्याची शक्यता?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कधीही होऊ शकतात.त्या अनुषंगाने सध्या अनेक खाजगी आणि खुपिया ऐजंन्सीचा धक्कादायक सर्व्हे येत असुन महाराष्ट्रातील येणाऱ्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे. त्यामुळे सामान्य जनता या जांगडबुंत्ता राजकारणाला पार कंटाळून गेली आहे. जनतेत फोडाफोडीच्या आणि गलिच्छ राजकारणाचा कळस सर्वदूर पोहोचलेला आहे.राजकारणाची पातळी फारच खालावली आहे.पुरोगामी महाराष्ट्रात यापूर्वी असे विचीत्र आणि फोडाफोडीचे राजकारण झाले नव्हते.
आमदार फोडल्या जात होते.पण अख्खा पक्षच फोडणे म्हणजे राजकारणाचा जांगडगुत्ता करणे होय. सरकारमधील सामील झालेल्या आमदाराला सामान्य जनतेचं काहीच घेणं देणं नाही. हे दिवसेंदिवस जनतेच्या लक्षामध्ये येत आहे. प्रचंड महागाई,अपुरा पाऊस, बेरोजगारी, खोळंबलेल्या पेरण्या, दुष्काळी परिस्थिती या व अशा अनेक समस्या आवासून उभ्या असतांनाही भाजपाची नेते मंडळी पक्ष फोडण्यात मशगुल होती. आणि आजही आहे. आज अनेक आमदार मतदार संघात जायला तयार नाही.उठसुठ मुंबईला जातात.गोरगरिब जनतेच्या समस्या कडे लक्षच नाही.मतदार संघात आले तर सामान्य माणसाला भेटत नाही.गणपतराव पाटील,सुदाम काका सारखी आमदार मंडळी दिसत नाही. सध्या सुरू असलेले राजकारण म्हणजे सब गोलमाल है भाई सब गोलमाल है! ज्या अजितदादा पवार यांच्यावर देशांचे पंतप्रधान भष्टाचाराचे आरोप करतात आणि ते दिल्लीत पोहचत नाही तर इकडे अजितदादा पवार यांचा शपथविधी होतो.आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीसह त्यांना अर्थ खाते देण्यात येते. यावरून भाजपा पक्षाची ध्येयधोरणे सबका साथ सबका विकास उघड झालेली असुन जनतेने 2014 ला काँग्रेसला कंटाळून ज्या विश्वासाने भाजपाला मतदान करुन सत्तेत आणले ते चुकीचेच झाले अशीच ओरड सर्वदूर पसरली आहे. शेतकऱ्याचे तर हाल झाले आहे.म्हणुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मतदार राजा आज नाराज झाल्याचे दिसत आहे.
*मागच्या आठवड्यात मी माझ्या तांडयावर गेलो होतो.परत येंताना नाल्याजवळ एक म्हैस चारणारा माणुस भेटला.त्याला महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत विचारले असता तो बिडी पित पुटपुटला याडीकार साहेब आम्हाला बिडीच माहित होती. या सरकारने सिडी आणि ईडी शुद्धा माहित करून टाकली. सगळा राजकारणाचा जांगडबुंत्ता झालेला आहे. त्यामुळे आता मतदान करतांना फार विचार करावा लागणार आहे. झालेली चुक सुधारण्याच्या संधीची आम्ही वाट पाहत आहो. साहेब मी एक म्हैस चारणारा माणुस आहे. मला काही राजकारण कळत नाही. पण तुम्हाला एवढेच सांगतो की, अनेक विद्यमान आमदारांच्या वाट्याला माजी आमदार अशी पाटी लावण्याची वेळ जवळ आलेली आहे साहेब! ही एका म्हैस चारणाऱ्या माणसाची फार बोलकी प्रतिक्रिया आहे.* अजितदादा माणूस चांगला,पण कसं काय बळी पडले माहीत नाही.त्याच अजित दादाला कंटाळून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले. त्यांची आज प्रचंड अडचण झालेली आहे. अशा प्रकारचे राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही जनतेने पाहिलेले नाही.
सरकारमधील शिंदे गटाची प्रचंड वाताहात झालेली असून ज्या अजितदादा पवार यांच्यावर त्यांनी नाराज होऊन शिवसेनेतून बाहेर पडले. त्याच अजितदादा पवार उपमुख्यमंत्री बरोबर त्यांना दिवस काढावे लागत आहे. अजितदादा पवार यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची देहबोली महाराष्ट्रातील तमाम जनतेने पाहिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना कितीही खदखद वाटत जरी असेल तरी शिंदे साहेबांचे परतीचे दोर कापले गेल्यामुळे त्यांना आता सहन केल्याशिवाय पर्याय नाही. त्यांची अवस्था आज सहन होत नाही.आणि सांगता येत नाही. अशीच झालेली आहे .
महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा भाजपच्या काही महत्त्वाकांक्षी नेत्यांनी पार बदलून टाकलेली आहे. त्यांना सध्या जरी आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तरी त्यांनी त्यांचीच कबर खोदुन ठेवलेली आहे . ही तेवढीच गोष्ट सत्य आहे. भाजपाने काहीही कारण नसताना प्रथम शिवसेना फोडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली पण त्यातून त्यांना काही मिळालेले नाही .उलट भाजपाचा राजकीय आलेख दिवसेंदिवस कमी कमी होत आहे . आणि लोकप्रियता घटत आहे.आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातली पोझिशन जर बघितली तर मूळ भाजपा मधील फक्त सहा मंत्री असून बाकी सगळे बाहेरून गोळा केलेले मंत्री आहेत. यावरून भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अजितदादा पवार यांच्या जब्बर महत्वकांक्षापुढे सध्या तरी कोणाचेही काही चालत नसल्याचे चित्र दिसत आहे. एवढेच नव्हे तर काही दिवसापूर्वी अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केल्यामुळे भाजपामधील अनेकांच्या झोपा उडालेल्या आहेत.आ बैल मुझे मार! अशीच भाजपाची परिस्थिती आज रोजी झालेली आहे. इतरांचे पक्ष फोडून आपल्याच पक्षातील आमदाराची वाट लावल्याची रणनीती दिल्लीच्या सांगण्यावरून जरी केली. तरी ती भाजपाला फार अडचणीची झालेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव अभ्यासू आणि उच्चविद्याविभूषित नेते आहेत. परंतु , या फोडाफोडीच्या राजकारणामुळे आणि मी परत येईन या घोषणेमुळे त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लागल्याचे दिसून येत आहे. शिवसेना फोडली .सरकार मजबूत असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेस फोडुन त्यांनी हसा करून घेतला आहे. जर हे दिल्लीतील शिर्षथ नेत्याचे ऐकुन फडणवीस साहेब करत असेल तर ते फारच चुकीचे आहे.कारण दिल्ली कधीही महाराष्ट्रातिल नेतृत्व सक्षम होऊ देत नाही.देवेद्रं फडणवीस हे सक्षम नेतृत्व होत होते. कदाचित त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी तर त्यांना या फोडाफोडीच्या राजकारणात गुंतल्या गेले असावे? ते काळच सांगेल..असो!
एकमात्र नक्की उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकारणात खेळलेले सर्व डाव हे सध्या तरी उलटत असल्याचे दिसून येत असून अनेक पेच निर्माण झाल्याचे राजकीय जाणकारांना वाटत आहे. या सर्व घडामोडीमुळे महाराष्ट्र तर मागे गेला.व भाजपा सुद्धा मागे गेली असुन भाजपाचे हे राजकारण सामान्य माणसाला अजिबात आवडलेले नाही अशीच सर्वदूर चर्चा सुरू आहे.आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा जांगडगुत्ता झाल्यामुळे भाजपाची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी अशी राजकीय फोडाफोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही झालेली नव्हती .परंतु भाजपाच्या मंडळींनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उठवलेले फोडाफोडीचे वादळ हे त्यांच्याच पथ्यावर पडेल अशीच आज सर्वत्र चर्चा आहे . *या सर्व प्रकारामुळे अनेक विद्यमान आमदाराच्या वाट्याला आता माजी आमदार अशी पाटी लावण्याची वेळ जवळ आलेली आहे. असेच चित्र सर्वत्र महाराष्ट्रात दिसून येत आहे.!* बघुया..घोडा मैदान जवळ आहे.
संकलन -याडीकार पंजाबराव चव्हाण
पुसद -94 21 77 43 72
ReplyForward |