साधी राहणी उच्च विचारसरणी तथा शांत स्वभावी, नुकतेच नागपूरचे विभागीय सहसचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले आदरणीय श्री.श्रीराम चव्हाण साहेब यांच्या जन्मदिनी मला लिहण्याची संधी मिळाली हे मी माझे अहोभाग्य समजतो,चव्हाण साहेब म्हणजे साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण. हे कोणीही सांगू शकेल यात काही शंकाच नाही.कितीतरी वर्षापासून दिनविशेष, प्रेरणादायी सुविचार सकाळच्या रम्य प्रहरी न चुकता साहेब वॉट्सॲप च्या माध्यमातून आम्हा सर्वापर्यंत पोहोचवतात त्या प्रेरणादायी सुविचार मुळे आम्हाला एकप्रकारची ऊर्जा मिळते आमचा दिवस आनंदात जातो.
साहेबांच्या या नित्य उपक्रमामुळे चांगले विचार आत्मसात करण्याची सवय आम्हाला जडली आहे.. 2015 पासून साहेब दिनविशेष संकलित करत आले आहे या सर्व नोंदी ते आपल्या वहीत लिहून ठेवायचे त्यामध्ये एखाद्या तारखेची संबंधित सर्व माहिती असायची उदाहरणार्थ महत्त्वाच्या व्यक्तीचा जन्मदिवस, स्मृतिदिन तसेच जागतिक राष्ट्रीय दिवस आधी त्यात साहित्यिकांची देखील जन्मदिनांक मृत्यू दिनांक असायचे या संकलनाला संदर्भकोशाचा स्वरूपात तयार करण्याची त्यांची आज तयारी सुरू आहे त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील साहित्यिकांची माहिती संकलित करण्यावर साहेबांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे अशा प्रकारे हा प्रवास त्यांचा सुरू झालेला आहे नुकतेच 31 मे 2023 रोजीच्या शासकीय निवृत्तीनंतर ते कामाला अधिक वेळ देणार आहेत सेवानिवृत्तीनंतर ते आपला वेळेचा सदुपयोग करून साहित्यिकांचा संदर्भकोश उत्तमपणे साकारण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
त्यांच्या मते किमान एक तरी पुस्तक प्रकाशित केलेल्या व्यक्तीला ते साहित्यिक म्हणतात या निकषानुसार ते राज्यातील साहित्यिक याची माहिती गोळा केली आहे. निश्चितच या कार्यात त्यांना बऱ्याच अडचणी सुध्दा आलेले आहेत पण ग्रंथ माझे सोबती या तत्त्वाप्रमाणे उपलब्ध असलेल्या विविध संदर्भ ग्रंथाची त्यांना प्रचंड मदत झालेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मराठी वाङ्मय कोश, संक्षिप्त वांग्मय कोस, वैदर्भीय सारस्वत, मराठवाडा सारस्वत, वास्तव लिखाण, विदर्भातील अक्षर ख्रिस्ती, समाजाची ग्रंथ संपदा, लेवा समाजाचे साहित्यिक, नाशिक जिल्ह्यातील साहित्य, गोतावळा, मराठी प्राध्यापकाची सूची, प्रकाशन विश्व यांच्या प्रामुख्याने समावेश आहे या ग्रंथाच्या माध्यमातून अनेक साहित्यिक याची माहिती त्यांना मिळवता आली आहे.
कुठल्याही एका तारखेवरून साहित्यिकांची माहिती उपलब्ध करून देणारा हा साहेबांचा पहिलाच अशा स्वरूपाचा हा संदर्भकोश असणार आहे कादंबरीकार, कथाकार, ललित, लेखक, कवी अशा वेगवेगळ्या वर्गवारीतील साहित्यिक त्यातून सहज शोधता येणार आहेत त्यामुळे संशोधनाच्या क्षेत्रात साहेबांचा संदर्भ कोश मोलाचा ठरणार आहेत असा साहेबांचा विश्वास आहे. विद्यार्थी संशोधक, साहित्यिक क्षेत्रातील मंडळी तसेच संस्थांना हा कोश अत्यंत उपयोगी होईल असा साहेबांचा विश्वास आहे जो व्यक्ती साहेबाच्या सानिध्यात आलेला आहे.तो व्यक्ती साहेबांच्या विचार सरणी आत्मसात करून यशो शिखरावर पोहचलेला आहे.
त्या पैकी मी एक. साहेबांनी माझ्या अंतरंगातील कलेला ओळखून सृजनात्मक कलेच्या विशाल सागरात मला रममाण करून दिल्यामुळे आज मी कलाशिक्षक,म्हणून नावारूपास आलो आहे. साहेबांनी माझच नाही तर कितीतरी गोर गरीब सुशिक्षित तरुणांना मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवून त्यांचे आयुष्य फुलविले आहे…उच्च पदस्थी असतांना सुद्धा अत्यंत साधी राहणीमान असणाऱ्या व उच्चकोटी विचार सरणी असलेल्या साहेबांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील वागद तांडा ( राजीव नगर) येथे श्री खिरू चव्हाण व सीताबाई चव्हाण यांच्या पोटी 1जून 1965 रोजी झाला.
मोठा परिवार, अठरा विश्व दारिद्र्य ,मूळ गावात 3री पर्यंत शिक्षणाची सोय तेही मोलमजुरी करून शिक्षण पूर्ण करावं लागलं साहेब शिक्षणात फारच हुशार होते अशी माहिती साहेबांच्या कुटुंबियांकडून मिळाली. पुढील शिक्षणासाठी वसतिगृहात राहून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.उल्लेखनीय म्हणजे साहेब पदवी चे शिक्षण घेत असताना अमरावती विद्यापीठातून मेरिट आले आहे.आणि पुढे मराठी विषयात एम. ए. करून बी. एड.केले.त्या गावातील ते पाहिले बी. एड. झालेले तरुण ठरले होते हे विशेष…
1 जुलै1987 ला फुलसावंगी जिल्हा यवतमाळ येथे शिक्षक म्हणून रुजू झाले.त्याच काळात मराठवाड्यातील श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील इवळेश्वर येथील प्रतिष्ठित नागरिक श्री गोपा भगू जाधव यांच्या सुकन्या सौ कुसूम सोबत लग्न झाले. माध्यमिक शिक्षक म्हणून काही वर्ष कार्य केले. नंतर यवतमाळ येथे ज्युनिअर कॉलेज मध्ये अधिव्याख्याता ,वरिष्ठ कॉलेज अधिव्याख्याता व अमरावती येथे डी.एड.कॉलेज अधिव्याख्याता म्हणून यशस्वी कार्य केले आहे.पुढे शिक्षण विस्तार अधिकारी,प्रशासन अधिकारी,घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे उत्कृष्ठ कार्य केले आहे .
साहेबाला शिक्षणाची आवड,जिद्द,चिकाटी ही आधीपासून होती त्यात घर सांभाळण्यात अर्धांगिनी सौ कुसूम बाईचा साथ साहेबाला खूप लाभला सुसंस्कृत घराण्यातील पत्नी लाभल्यामुळे साहेबाला पुढे खूप काही करण्याची इच्छा निर्माण झाली असावी..त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर साहेब 1994 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा खुल्या संवर्गातून उत्तीर्ण झाले.नागपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागात पंचायत समिती भिवापूर येथे गट शिक्षणाधिकारी म्हणून साहेबांची प्रथम नियुक्ती झाली. भिवापूर पंचायत समिती शिक्षण विभागात काम करत असताना वेग वेगळे उपक्रम राबविले उपक्रमात स्वतः सहभाग घेऊन शिक्षकाचा उत्साह वाढवला. विविध यशस्वी उपक्रम राबवून राज्यात भिवापूर चे नाव नोंदवून दिले. सात शैक्षणिक विभागांपैकी सहा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व एका स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. दृष्टीदोष कार्यक्रमामध्ये भाग घेऊन सतत दोन वर्ष प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी वर्षात लोकवर्गणीतून एक लाख रुपये गोळा करून साहेबांनी दत्तक योजनेमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. साक्षरता अभियान कार्यक्रम अंतर्गत अनेक खेडो पाडी कलापथकाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली आहे.उत्कृष्ट कार्य केल्यामुळे विविध पदकानी साहेबाना सन्मानित करण्यात आले होते.
पुढे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद नागपूर येथे साहेबांची बदली झाली आणि साहेबांनी कार्यालयीन कामकाजा सोबत समाजाच्या सांस्कृतिक समारंभात विशेष कार्य केले आहे. माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, वसंतराव नाईक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, साने गुरुजी यांच्या विचारांचा प्रभाव साहेबांच्या वागण्यावरून,बोलण्यावरून नेहमी येतो.
शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करत असल्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून साहेब सर्वत्र परिचित झाले आहेत. साहेबांनी काही काळ निरंतर शिक्षण विभागात कार्य करून त्या क्षेत्रातही चांगला ठसा उमटवला आहे.सहाय्यक संचालक म्हणून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.येथे काहीकाळ कार्य केले आहे.नंतर नागपूर विभागीय सहायक सचिव सोबत शिक्षण उपनिरीक्षक( विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय) हा अतिरिक्त कार्यभार साहेबांनी चोख सांभाळला.
काही काळ नागपूर विभागीय सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार साहेबांनी सांभाळले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ नागपूर येथे सध्या विभागीय सहसचिव म्हणून साहेब कार्यरत आहे. उपक्रमशील अधिकारी म्हणून साहेब नेहमी अग्रेसर राहायचे.अभ्यासू वृत्ती,उत्तम वक्ता म्हणूनही साहेबांची आज ओळख असायची.दरवर्षी होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी, शिक्षक, पालक हेल्पलाईन च्या माध्यमातून सकारात्मक मार्गदर्शन आणि समुपदेशन साहेब करत असत. विभागातील सर्व शाळांमध्ये साहेब आज सुपरिचित आहे.
सर्व सेवा अतीउत्कृष्ट असून साहेब सेवानिवृत्त झाल्यामुळे “मराठी साहित्यिकांचा कोश” या संदर्भ ग्रंथाचे लेखन साहेबांच्या हातून यद्ध पातळीवर सुरू आहे. साहेबाना क्रिकेट खेळात प्रचंड आवड असून ते स्वतः आजही क्रिकेट खेळतात. साहेब आपल्या मूळ गावाशी नाळ घट्ट जोडून ठेवलेली आहे गावातील लोकांशी साहेबांचा जिव्हाळा आजही कायम आहे..गावात होणाऱ्या सण समारंभात साहेब परिवारासहित उपस्थित राहतात. साहेब व तिन्ही भाऊ मूळ गावी गेले म्हणजे कुटुंबा सहित एकोप्यानेच राहतात हे विशेष… साहेबांचे एक ब्रीद वाक्य “तुम्ही दुसऱ्याचं चांगलं करा तुमचं नक्कीच चागलं होईल”
साहेब नुकतेच सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा बंजारा समाजा तर्फे सापत्नीक सत्कार सुद्धा करण्यात आला आहे.
साहेबांना दोन मुली व एक मुलगा आहे दोन्ही मुली विवाहित असून मुलगा अविवाहित आहे. त्यापैकी मोठी मुलगी सौ स्नेहश्री ही बी. ई. झाली असून जावई अभियंता आहे..दुसरी मुलगी सौ गौरवी ही एम. टेक. झाली असून जावई आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून. कार्यरत आहे.. मुलगा कौस्तुभ नागपूर येथे एका शाळेत कार्यरत आहे..मुले घडविण्यात व घर सांभाळण्यात साहेबांच्या पत्नी सौ कुसूम चव्हाण यांचा सिंहांचा वाटा आहे.
* संपर्क : श्रीराम चव्हाण
(सेवानिवृत्त विभागीय सहसचिव)
9822695372
साहेब तुमच्या आयुष्यात आनंद व सुख लाभो.
हाती घेतलेल्या संदर्भ ग्रंथाच्या लेखन शैलीला भरभरून यश मिळो.
तुमचे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो.
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात सदैव दरवळत राहो..
हीच तुमच्या वाढदिवशी ईश्वरचरणी प्रार्थना..
साहेब आपणास वाढदिवसाच्या मनापासून कोटी कोटी शुभेच्छा..!
– सुरेश बा.राठोड
(कलाशिक्षक)
राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर.
जिल्हा नागपूर
9765950144