- दोन मनं,दोन वंश
- नवीन सुरुवात जीवनाची
- आनंदी जीवन जगण्याची !!
खरंच विवाह म्हणजे पवित्र बंधन अतूट नातं साता जन्माचा तसे बघितले तर विवाहाचे कायदेशीर वय मुलांसाठी 21 वर्षे आणि मुलींसाठी अठरा वर्षे असेच निश्चित केलेले आहे. कारण या वयात मुलं-मुली मध्ये परिपक्वता आलेली असते पण ही पद्धत हळूहळू बदलत चाललेली आहेत. त्यातल्या त्यात कुटुंब नियोजन त्यामुळे बदलती सामाजिक परिस्थिती आणि शिक्षणाचे वाढते प्रमाण बघता प्रत्येक जण करिअरच्या मागे धावत आहे. त्यामुळे विवाहाचे वय वाढत चाललेले आहे याचा परिणाम विवाह संस्थांवर देखील झालेला दिसतो, त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील परिस्थिती आणि शहरातील परिस्थिती यात बराच फरक बघायला मिळतो. याचबरोबर विवाहाच्या कल्पना आणि विवाहाची पद्धत सुद्धा बदलत चाललेली आहे काही ग्रामीण क्षेत्रात अजूनही बालविवाहाची प्रथा सुरूच आहे. उदाहरणार्थ राजस्थान मध्य प्रदेश आसाम याउलट शहरात आहे मुले मुली त्यांच्या विवाहाचे वय फारच वाढलेले आहे 25 ते 32 वर्ष या मुलांचा जीवनक्रम म्हणजेच रुटीन ठरलेले असते जितके हवे तितके शिक्षण पूर्ण करायचे नंतर नोकरी शिक्षणावर अवलंबून अशीच मिळवायला हवी.
त्यानंतर विवाहाचा विचार तोपर्यंत मित्र-मैत्रिणी यांच्यात हवा तसा भरपूर वेळ घालवायचा किंवा लव इन रिलेशनशिप वगैरे वगैरे म्हणजेच दहावी नंतर कमीत कमी सात आठ वर्षे शिक्षणात नंतर दोन तीन वर्षे नोकरीत इकडे वय वाढत जाते आई वडील चिंतेत मुले करिअरच्या मागे त्यामुळे विवाहाचे वाढते वय 28 ते 32 असे झालेले आपण बघतोय वाढलेले वय त्यामुळे समस्या बघायला मिळतात त्यांना मुलांची जबाबदारी सुद्धा नको लव इन रिलेशनशिप सर्व भेट मदर असेही मुद्देसमोर येतात विवाहाचे पवित्र बंधन हल्ली राहिलेलेच नाही अटूथ नाते क्षणात तुटून जाते हेही प्रकार आपण वर्तमान पत्र दूरदर्शन बातम्या किंवा आजूबाजूला नात्यात सुद्धा ऐकत असतो पूर्वी एकत्र कुटुंब असायचे त्यामुळे कुटुंबाच्या मुख्य व्यक्तींच्या आज्ञेचे पालन व्हायचे काळानुसार विवाह पद्धत सुद्धा बदलत गेले.
आधुनिक तंत्रयुगात विवाहबंध विवाह सर्वत्र बदललेले आहे यातील काही बदल योग्य आहेत काही बदल अयोग्य विवाह म्हणजे दोन मनांचे दोन कुटुंबांचे मिलन होय एक मैत्री होय पूर्वी फक्त आपल्याच जातीत धर्मात प्रांतात बरोबरीत विवाह जुळायचे काही ठिकाणी आते घरी भाचे सून होत असे स्वयंवर पद्धती अस्तित्वात होती पुराणातील कितीतरी प्रेम कथा आजही आपल्या स्मरणात आहेत उदाहरणार्थ सत्यवान सावित्री पृथ्वीराज संयुक्त द्रौपदी स्वयंवर दुष्यंत शकुंतला वगैरे वगैरे या पौराणिक कथा जरी असल्या तरीही काही आनंद देणारे आहेत काही महाभारत घडविणाऱ्या जन्माला घातले काळानुसार विवाह पद्धती बदलत गेल्या परकीय आक्रमणे मनाविरुद्ध लाभलेल्या विवाहाला बळी पडणे वगैरे राजकारण ही बघायला मिळाले काही वीरांनी उदाहरणार्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अल्पकाळाचे वैवाहिक जीवन जगले सर्व जीवन देशाला अर्पण केले पण आज विवाहस्वरूप पालटत आहे काळानुसार प्रत्येक संकल्पना बदलत गेल्या बदल हा सृष्टीचा स्थायीभाव असला तरी प्रत्येक विवाह परंपरेत झालेला बदल हा चांगलाच आहे असे म्हणता येणार नाही बदल जरी झाला असेल पण माणसांच्या भावना बदलत चाललेले आहेत तेही सगळीकडे आपण आज बघतोच आहोत या आधुनिक तंत्र युगात विवाहाच्या वाढत्या वयात शिवाय विवाह बंधनात देखील बदल बघायला मिळतोच आज प्रत्येकाची जीवनाची गती मानता आधीपेक्षा खूप वाढली आहे.
आधी घरोघरी जाऊन लग्नाच्या आमंत्रण अक्षता पत्रिका नेऊन देतात त्यात आपुलकी प्रेम जेव्हा दिसेल पंगत जेवणाची असायची घरचे मंडळी वाढायचीआग्रहाने मुलीला मैत्रिणी तयार करायच्या यावरून आपण बघतोय आधुनिक तंत्र विगात नुसता पैसा फेक तमाशा देख पाण्यासारखा पैसा उधळतात मेकअप मेहंदी तरी समाधान कुठे दिसत नाही फक्त देखावा असतो महत्त्वाचे म्हणजे वाढत्या वयात केलेले लग्न टिकेल की नाही याची खात्री नसते कारण वाढलेले वय नेतृत्वाचे नाते दोघांचेही नोकरी आणि घमेंड आलेल्या परिस्थितीला जोडून घेण्याची प्रवृत्ती नसते व यातही अंतर नसते काही ठिकाणी तर मुलगी मुलापेक्षा मोठेही असते तरीही लग्न करता तू तो मेसेज तर भांडणे या रे तुझे मानसन्मान कुठेच दिसत नाही हम किसीसे कम नही भूमिका बघायला मिळते.
शेवटी काय घटस्फोट? घटस्फोट झाला तरीही कुठेही लाज लज्जा नाही मजेत राहतात परत दुसरे लग्न करून मोकळे तू नही तो और सही वगैरे तिथेही नाही पटले तर तिसरे लग्न असे प्रकार होतात किंवा सगळ्यात सोपे म्हणजे आत्महत्या खरं तर विवाह एक सुंदर बंधन आहे विवाह एक सुंदर संगम आहे विवाह एक सुंदर मिलन आहे विवाह एक सुंदर सफर आहे महिलांचे आरोग्य राखणे त्यांना कुपोषणापासून वाचविणे कमी वयात लग्न होऊन मृत्यू पासून वाचविणे महिलांना उच्च शिक्षण घेऊन करिअरची संधी मिळावी हाच सर्व सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे एका टास्क फोर्सची नियुक्ती करून 2020 मध्ये सरकारने विवाहाचे वाढते वय मुलींचे 21 वर्ष आणि मुलांचे 25 वर्ष केलेले आहे आणि हेच सर्व दृष्टीने योग्य वय आहे असे माझे मत आहे दोघांमध्ये समजदारी परिपक्वता आणि जबाबदारी सर्व गोष्टींची जाणीव होऊ शकते. हाच त्या मागचा उद्देश.
- “विवाहाचे वाढते वय
- फारच अवघड असते.
- चेह-यावर कोमलता
- मुळीच दिसत नसते “
- “विवाह एक बंधन आहे
- विवाह एक संगम आहे
- विवाह एक मिलन आहे
- विवाह एक सफर आहे “
- हर्षा वाघमारे
- नागपूर
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–