- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातीलच तथागत बुद्धाचा धम्म देवून जी क्रांती केली ती खुपच अनमोल आहे आणि आता तो धम्म टिकविण्याचे काम आपणावर येवून ठेपले आहे. तेव्हा तरुण मुले, मुली यांना श्रामनेर दिक्षा दिली पाहिजे हे काम प्रत्येक बुद्धविहारातून झाले पाहिजे. बुद्धविहारे ही बौद्ध विचारांची झाली पाहिजेत असे महत्त्वपूर्ण भंते शाक्यपुत्र राहुल, श्रावस्ती बुद्धविहार पैठण 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या धम्मदेसना या कार्यक्रमात प्रतिपादन केले. तसेच क्रांती प्रतीक्रांती या विषयावर त्यांनी फार उपयुक्त असे प्रबोधन केले. सदर कार्यक्रम बौद्ध उपासक संघ भिमटेकडी संघ अमरावती द्वारा आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, संबोधी मध्ये नुकताच संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व आदर्श प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. प्रसंगी बौद्ध उपासक संघाच्या महिला चमुने नंदिनी वरघट, ज्योति बोरकर, प्रतिभा प्रधान, पुष्पाताई दंदे, नलिनी नागदिवे आदिनी सामुहिक त्रिशरण पंचशिल घेतले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे धम्मदिक्षा कार्यक्रमात 22 प्रतिज्ञा दिल्यात त्याचे सामुहिक वाचन नंदिनी वरघट यांच्यातर्फे करण्यात आले.
प्रसंगी सदर धम्मदेसना कार्यक्रमाचे अध्यक्ष, आंबेडकरी विचारवंत शिवा प्रधान हे होते. धम्मचक्र प्रर्वतन होवून 66 वर्षे पूर्ण झालीत तरी पाहिजे त्या प्रमाणात धम्माचा प्रसार, प्रचार मात्र त्रोटकाच आहे. आणि बुद्धधम्म एक जागतिक मानवता वादाचे सुत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास खरी आत्मसन्मानाची पर्वणी दिली आहे ती या बुद्धधम्मामुळेच विहारे हे एक वैचारिक क्रांतीचे केंद्र बनली पाहिजे धम्मचळवळ पुढे नेण्यासाठी धम्म समजून घेवून हरेकाने त्याला गतिमान केले पाहिजे. असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन धम्मदेसना कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणाने मा. शिवा प्रधान यांनी व्यक्त केले. धम्मपिठावर भीखुनी धम्मचारिणी व आयु. प्रा. पाटील हे प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमात उद्बोधन केले.
कार्यक्रमात प्रामुख्याने प्रमुख वक्ते म्हणून प्रा. बी.टी. उरकुडे यांनी सुद्धा उद्बोधक विचार मांडलेत तसेच भिक्कुनी आर्यप्रजापती, अमरावती यांनी सुद्धा आपले मौलिक विचार मांडून प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. भाऊराव दहाट यांनी केले तर कार्यक्रमाचे सुरेख व अभ्यासपूर्ण संचालन आयु. उमेश शहारे यांनी केले. कार्यक्रमामध्ये नंदिनी वरघट, प्रतिभा प्रधान, ज्योती बोरकर यांनी पाहुण्यांचा परिचय दिला.
कार्यक्रमाचे आभार आयु. गंगाधरराव इंगळे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उपासक संघाचे भाऊराव दहाट, चरणदास काळे, अवधुत गजभिये, व्यंकटराव खोब्रागडे, आनंद इंगळे, नामदेवराव वाघमारे, उमेश शहारे, गंगाधर इंगळे तसेच ज्योती बोरकर, प्रतिभा प्रधान, पुष्पा दंदे, अनिता रोडगे, नलिनी नागदिवे, राहुल हिरकने, तुळशीदास मेश्राम आदीनी परिश्रम घेवून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाला बहुसंख्य उपस्थिती लाभली.