Contents
hide
*महर्षी वाल्मिकी जयंती समाजसेवकाचा सत्कार करून केली साजरी.*
अमरावती स्थानिक प्रतिनिधी-दि.05 नोव्हेंबर, श्री.गुरुदेव महर्षी वाल्मिकी यांनी प्रभु श्रीरामचंद्र हे जन्माला येण्यापुर्वी प्रसिध्द वाल्मिकी रामायण ग्रंथ लिहिला त्या ग्रंथातील प्रत्येक शब्द, प्रत्येक घटना भविष्यात खऱ्या ठरल्या असे वाल्मिकी रामायण याचे पुजन विश्वात व भारतात सर्वत्र होत असते. रामायण मालीका सर्व देशात व इतर राज्यातही सर्व भाविक भक्त मोठ्या आवडीने बघत असतात. भारतीय संस्कृतीत सकारात्मकतेचे सार असलेल्या वाल्मिकी रामायण या महाकाव्याची रचना करुन महर्षी वाल्मिकीने समाजमन घडविण्याचे महान कार्य केले. त्याग,समर्पण,निष्ठा,आणि सत्याचा पुरस्कार करणाऱ्या महान तत्वांचे पायाभरणी वाल्मिकी रामायण या महान ग्रंथाने केली आहे. वाल्मिकी जयंती महोत्सव हा या महान कार्याचाच एक गौरव आहे. महर्षी वाल्मिकी यांच्या तत्वज्ञानानुसार जे गुरुशिक्ष परंपरा आजतागायत पाडली जात आहे. त्याचा समाजमनाने अंगीकार करावा व आपले जिवन समृध्द व सुखःमय करावे हा मुळ उद्देश
महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्याने साधला जाईल असे गौरवद्गार महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतीमेचे पुजन
करुन आयोजक श्री.उमेश ढोणे यांनी प्रास्ताविक मांडताना केले. संत,ऋषी हे सर्वत्र देशातील भाविक भक्तगंणाचे उद्धार करण्यासाठीअसून त्यांच्या विचाराचे अंगीकार असणारे व्यक्तीमहत्वाचा सत्कार युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती निमित्याने श्री.एकनाथरावजी वावरे, श्री.प्रकाश दंदे,गणेशदासजी गायकवाड, अजय बोबडे, संतोष कोलटके, आकाश राजगुरे यांचा सत्कार खासदार व आमदार यांचे कार्यालयाचे सचीव उमेश ढोणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.. यावेळी एकनाथरावजी वावरे, श्री.प्रकाश दंदे, श्री.गणेशदासजी गायकवाड, अजय बोबडे, संतोष कोलटके, आकाश राजगुरे, आनंद भोयर, दिपक ताथोड, संतोष कोलटके, शुभम चौधरी आदी सामाजीक अंतर ठेवून सरकारचे आदेशाचे पालन करुन कमी संख्यामध्ये असलेल्या भाविक भक्तगंणाच्या उपस्थितीत महर्षी वाल्मिकी जयंती चा कार्यक्रम करण्यात आला.