बुलडाणा : क्षयरोग ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक समस्या असुन 2025 पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. शासकिय व खाजगी वैद्यकिय व्यवसायिकांकडे क्षयरूग्णांचे नोटीफीकेशन वाढविण्यात यावे. शासकिय आरोग्य संस्थेतील कार्यक्षेत्रामध्ये क्षयरोगाबाबत लोकवस्ती सभा, शाळा , महाविदयालय, वस्तीसभा, पाडासभा, विटभटटी अशा विविध स्तरातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहेत.
जिल्हा टिबी फोरम व टिबी कोमॉबिडीटी जिल्हा समितीची आढावा सभा 9 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी मिलींद पा.जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे, जि. प सदस्य आशिष रहाटे, वैदयकिय अधिक्षक डॉ. मिनल कुटुंबे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ गोफणे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी एस राममूर्ती म्हणाले, क्षयरुग्णांना पुर्णपणे बरा करण्यासाठी शासनस्तरावरुन पोषण आहारासाठी प्रति महिना 500 रूपये माहे एप्रील 2018 पासुन देण्यात येत आहे. प्रत्येक क्षय रूग्णाला वेळेत व नियमित उपचार मिळण्यासाठी कार्यवाही करावी. क्षयरूग्णांना पौष्टिक आहार देण्यात यावा. तसेच समाज कल्याण योजनांशी क्षयरूग्णांना जोडण्यात यावे. क्षयरुग्णांच्या तक्रारीचे निवारण करावे.
याप्रसंगी डॉ. असलम, संदीप चव्हाण, ॲड विजय सावळे, अशोक अग्रवाल, विनोद पाटील, गजानन शिंदे, निलेश गावंडे, आशिष ओझा, कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले, समन्वयक गजानन देशमुख व टिबी चॅम्पीयन श्रीमती ज्योती शिगणे, मंगलसींग राजपुत, ईसार खान पठाण यांनी आपले मनोगत विषद केले. तसेच जिल्हा क्षयरोग केंद येथील सिध्देश्वर नारायण सोळंकी, जिल्हा समन्वयक अनिल सोळंके, आशिष वाईनदेशकर, राजेंद्र सुरडकर, मुकेश घेंगे, योगश शिरसाठ, श्री.सरोदे आदी अधिकारी व कर्मचारी सभेस उपस्थित होते. आभार प्रर्दशन क्षयरोग अधिकारी डॉ. मिलींद जाधव यांनी केले.