अमरावती : दिवाळीच्या शुभंपर्वावर लोकसभेच्या महिला सशक्तीकरण समितीवर अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत रवी राणा यांची लोकसभा अध्यक्ष माननीय ओमजी बिर्ला यांचे आदेशाचे वरून समितीचे सद्स्य म्हणून निवड झाली आहे.देशातील इतरही लोकसभेच्या व राज्यसभेच्या माननीय महिला खासदार हया या समितीचे सदस्या आहेत.
थेट लोकसभा अध्यक्ष मा. ओमजी बिर्ला यांचे माध्यमातून या समितीद्वारे महिला धोरणं ठरविण्यासाठी खासदार राणा यांना मिळणार संधी. देशातील विविध राज्यात महिलांच्या अत्याचार प्रकरणात या समितीचे माध्यमातून जाब विचारला जाणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष यांनी आदेश काढून त्यांचे आदेशाचेनुसार अतिरिक्त सचीव मा. कल्पना शर्मा यांनी त्यांचे पत्रक क्र.4(1)EWC/2020 दिं10नोव्हेंबर2020 रोजीच्या पत्राद्वारे खासदार नवनीत राणा यांना नियुक्त केले आहे. हि समिती किंवा समितीचे सदस्य ज्या ज्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत अन्याय होत आहे असे वाटते तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही समिती काम करेल हि समिती त्यांच्या सूचना, अभिप्राय माननीय लोकसभा अध्यक्ष यांचेसमोर ठेऊन त्यावर अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्ष घेतील न्यायोचित धोरण निश्चित होईल-ठरविल्या जाईल.या माध्यमातून देशातील ज्या ज्या महिलांच्या बाबतीत अन्याय होत असेल अश्या घटकांनसाठी खासदार नवनीत राणा हया काम करतील राणा त्यांनी या समितीबाबत भावना,आनंद व्यक्त केला आहे. यापूर्वी हि खासदार नवनीत राणा यांनी अनेक महिलांच्या अत्याचारसबंधी लोकसभेत आपला आवाज बुलंद करून प्रश मांडले आहेत.आणखीन एक आयुधं या समितीचे माध्यमातून माननीय अध्यक्ष लोकसभा यांनी राणा यांना उपलब्ध करून दिले आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, माननीय अध्यक्ष लोकसभा ओमजी बिरला यांचे खासदार नवनीत राणा यांनी आभार मानले आहे.
Contents
hide
Related Stories
November 22, 2024