बुलडाणा : भारतरत्न मौलना अब्दुल कलाम आझाद भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. त्यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात येते. त्यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ऑनलाईन विद्यार्थी परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्ह्यातील विविध शाळांमधील 40 विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. परिसंवादाचे उद्धाटन शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, अंजली नेटके, शिक्षण विभागातील व समग्र शिक्षा विभागातील सर्व अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. परिसंवादाच्या सुरूवातीला शिक्षणाधिकारी डॉ. पानझाडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत करीत राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. परिसंवादाचे संचलन उपशिक्षणाधिकारी श्री. जैन यांनी केले. या परिसंवादात सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक सहभागी झाले होते. आभार कार्यक्रम अधिकारी मंगेश भोरसे यांनी मानले.
Contents
hide
Related Stories
October 31, 2024
October 19, 2024
September 3, 2024