बुलडाणा: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लक्षाकांचे सन 2020-21 मधील वाटप बँकांना करण्यात आल आहे. महामंडळाच्या योजनातंर्गत पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही बँक शाखेमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज परतावा करण्यासाठी सदर महामंडळ बांधील आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतंर्गत 10 लाख पर्यंतच्या योजनेच्या बँक मंजूर रकमेवरील व्याज परतावा 3 लाख पर्यंत महामंडळ देणार आहे. तरी बँकांनी कोणत्याही लाभार्थ्याला बँकेमार्फत लक्षांक नाही किंवा लक्षांक संपुष्टात आले आहे. या कारणास्तव कर्ज देण्यापासून वंचित ठेवू नये. जिल्ह्यात जिल्हा अग्रणी बँक कार्यालया अंतर्गत बँकांना 2500 लक्षांक बँक मंजूरीकरीता देण्यात आला आहे.
बँकनिहाय प्रकरणे व रक्कम लक्षांक : अलाहाबाद बँक 16 प्रकरणे व 80 लक्ष रूपये, आंध्रा बँक 16 प्रकरणे व 80 लक्ष रूपये, बँक ऑफ बडोदा 24 प्रकरणे व 1 कोटी 20 लक्ष रूपये, बँक ऑफ इंडिया 112 प्रकरणे व 5 कोटी 60 लक्ष रूपये, बँक ऑफ महाराष्ट्र 296 प्रकरणे व 14 कोटी 80 लक्ष रूपये, कॅनरा बँक 48 प्रकरणे व 2 कोटी 40 लक्ष रूपये, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 262 प्रकरणे व 13 कोटी 10 लक्ष रू, देना बँक 16 प्रकरणे 80 लक्ष रूपये, आयडीबीआय बँक 58 प्रकरणे व 2 कोटी 90 लक्ष रूपये, इंडियन ओव्हरसिस बँक 74 प्रकरणे व 3 कोटी 70 लक्ष रू, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 16 प्रकरणे व 80 लक्ष रूपये, पंजाब नॅशनल बँक 32 प्रकरणे व 1 कोटी 60 लक्ष, स्टेट बँक ऑफ इंडिया 624 प्रकरणे व 31 कोटी 20 लक्ष रूपये, सिंडीकेट बँक 16 प्रकरणे व 80 लक्ष रू., युको बँक 32 प्रकरणे व 1 कोटी 60 लक्ष रू, युनीयन बँक ऑफ इंडिया 32 प्रकरणे व 1 कोटी 60 लक्ष रू, विदर्भ कोकण ग्रामीण बँक 364 प्रकरणे व 18कोटी 20 लक्ष रू, ॲक्सीस बँक 80 प्रकरणे व 4 कोटी रूपये, एचडीएफसी बँक 148 प्रकरणे व 7 कोटी 40 लक्ष रू, आयसीआयसीआय बँक 104 प्रकरणे व 5 कोटी 20 लक्ष रू, बीडीसीसी बँक 130 प्रकरणे व 6 कोटी 50 लक्ष रक्कम लक्षांक आहे, असे अपामचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
Contents
hide
Related Stories
October 31, 2024
October 19, 2024
September 3, 2024