आमदार देवेन्द्र भुयार यांची भेमडी येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी !
गावकऱ्यांच्या भेटी घेऊन देण्यात आल्या मंगलमय दिवाळीच्या शुभेच्छा !
भेमडी येथील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण !
वरुड : आमदार देवेंद्र भुयार यांनी दिवाळीचा दिवस भेमडी येथील नागरिकांसोबत घालवून दिवाळी सन मोठ्या उत्साहात साजरा केला. दिवाळी म्हणजे दिवा, दिवाळी म्हणजे उत्साह, दिवाळी म्हणजे शेतातल्या पिकाचा मोबदला हाती आल्यावर मिळणारं सुख यांव्यतिरीक्त दिवाळी म्हणजे प्रेम व आपुलकीचं प्रदर्शनही असतं.
असाच क्षण आमदार देवेंद्र भुयार यांच्या आयुष्यात घडला, आमदार देवेंद्र भुयार यांनी त्यांची खास दिवाळी आदिवासी बांधवांसमवेत साजरी केली. भेमडी येथिल बाबाराव आहाके यांच्याकडे जाऊन तेथे गायीगुरांचे पुजन केले. आदिवासी बांधवांशी भेटीगाठी घेतल्या. यावेळी गावकर्यांनि छोटेखानी कार्यक्रम घेऊन गावकऱ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांनी वेळोवेळी प्रेम देऊन त्यांना दसपट प्रेम देण्याची आपली ही संस्कृती आम्ही सर्व मित्रमंडळींनी जपली आणि दरवर्षी जपत आल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले. दिवाळी आणि आदिवासी बांधव यांचे अतुट नाते आहेत. दिवाळीच्या संस्कृतीशी ते मेळ खातात. आज जरी खूप ठिकाणी ही संस्कृती लोप पावत असली तरी वरुड मोर्शी मतदारसंघातील आदिवासी भागांमध्ये मानवतेचे दर्शन प्रकर्षाने घडते.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांना आजची दिवाळी भेमडी येथील बांधवांसोबत घालविण्यात खूप समाधान मिळालं. त्यांचा नेता त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करतोय हे त्यांना समाधान, आणि आपल्या हक्काच्या माणसांसोबत असल्याचं मला सुख मिळालं हाच माझा परीवार आहे, हेच माझे लोकं आहेत. यांमध्येच माझे मायबाप भाऊ बहिण शोधून घरावर तुळशीपत्र ठेवून निघालो होतो असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
शहरातील, मेट्रोतील प्रचंड झगमगाटाच्याहीपुढे मला येथिल मातीचे दिवे जास्त जवळचे वाटतात. मंत्रालयातील कामांच्या निमीत्ताने मुंबईला खूपदा जावं लागतं. पण या मातीचा, या माणसांचा गंध काही औरच आहे असे प्रतिपादन यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार , प्रदीप सिरसाम, छत्रपती कंठक, मकसूद पठाण, राहुल नागपुरे, बाबाराव आहाके,शेषराव युवनाते,वसंतराव परतेती, दिवाकर धुर्वे,भीमराव धुर्वे, गोपाल धुर्वे, बाबाराव सलामे,जानराव वाडीवे, नागोराव बेले,अनिल धुर्वे,रमेश आहाके,मधुकर धुर्वे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.