करजगावच्या इतिहासात प्रथम विद्यार्थीनी आणि करजगावच्या प्रथम शिक्षिका म्हणून वेणुताई महल्ले यांच नाव आजही आदराने घेतले जाते.
16नोव्हेंबर1944रोजी एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मोतीरामजी हिरवे त्यांचे वडील . खरं म्हणजे त्याकाळी शिक्षणाचा प्रसार झालाच नव्हता, आणि त्यातल्यात्यात स्त्रीशिक्षणाची तर सुरूवातच होती.2.7.1952ला करजगावला शाळा सुरू झाली .पहिल्याच बॅचच्या त्या विद्यार्थीनी होत्या. वेणुताई नी सातवीपर्यंत चे शिक्षण गावीच घेतल्यानंतर PRE-PTC अभ्यासक्रम पूर्ण करून करजगावच्या प्रथम शिक्षिका म्हणून रूजू झाल्यात. याच कालावधीत त्यांचा विवाह पाळोदी येथील किसनराव नारायणराव महल्ले यांच्याशी झाला.
करजगावच्या देशी पूर्व माध्यमिक शाळेत त्यानी 11 वर्षे सेवा दिली. त्यानंतर त्यांची बदली नेर येथे झाली. अशोकनगर शाळेत7वर्षे आणी नंतर कन्या शाळेत 20 वर्षे अशी38 वर्षे प्रदीर्घ सेवा देउन 30 नोव्हेंबर 2002ला त्या सेवानिवृत्त झाल्या.
केवळ स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता त्यांनी सासर आणि माहेर कडील मुले शिक्षणासाठी आपल्या घरी शिकविलित. करजगावचे भुषण असलेल्या डॉ.नंदकिशोर हिरवे सारख्या कोहिनूर हिर्याला पैलू पाडण्याचं काम देखील वेणुताईचेच. त्यांच्यामुळेच करजगावला पहिला Ph.D,आणि कृषी संशोधक लाभला.
त्यांच नेरला स्वतः चं घर असून सेवानिवृत्तीनंतर काही शेती सुध्दा घेतली. मोठा मुलगा शेती सांभाळतो व लहान मुलगा पुण्याला चांगला चित्रकार आहे. 2014ला किसनराव महल्ले च्या मृत्यू नंतर कुटुंब प्रमुखाची जबाबदारी त्यानी समर्थपणे पेलली. आजही घरच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा शब्द अंतिम आहे. परंतु अलिकडे त्यांना पक्षाघाताचा झटका येऊन गेला.त्यामुळे थोड्या कमजोर झाल्या. पण स्मरणशक्ती आजही चांगली आहे. गावाकडील सारं काही आठवते. वाचणाची सुध्दा खुप आवड आहे. छावा, मृत्युंजय सारख्या कादंबर्या ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ त्यानी वाचले आहेत.
आम्हाला जेव्हा त्यांच्या प्रकृती विषयी कळले तेव्हा मी, शेषराव, विष्णू तवकारची, आणि डॉ. नंदकिशोर हिरवे त्यांना भेटायला गेलो. त्यांना चालता येत नव्हते, अक्षरशः आधार देऊन आणावे लागले. बराच वेळ गाव, शाळा व शिक्षकाबाबत गप्पा मारल्या नंतर जेव्हा शाल, श्रीफळ साडी ब्लाऊज पीस देऊन सत्कार केला तेव्हा त्यांच्या भावना उचंबळून आल्यात आणि त्यांना गहिवरून आलं
आज वेणुताई चा76वा वाढदिवस. त्यानिमित्ताने ‘आम्ही सारे करजगावकर ‘ ग्रूपच्या वतीने त्यांच्या उदंड आयुरारोग्याची ईश्वरचरणी प्रार्थना करित आहो.
-Ramesh Warghat
Contents
hide
0 thoughts on “करजगावच्या इतिहासात प्रथम विद्यार्थीनी आणि करजगावच्या प्रथम शिक्षिका वेणुताई महल्ले”
Leave a ReplyCancel reply
Related Stories
October 31, 2024
October 19, 2024
September 3, 2024
वेणुताईच्या ज्ञानदानाचा वारसा पुढे चालविण्याची खाडीच्या वाट्या सारखी संधी शिक्षक म्हणून आम्हास लागली हे आमचे भाग्य समजतो
Very Nice information