दिवाळी म्हणजे उत्साह, नवचैतन्य, नवी उमेद व सगळीकडे आनंद ही आनंद बघायला मिळतो. दिवाळी म्हणजे प्रतीक्षा, स्वप्नपूर्ती व मनोकामना व्यक्त करण्याचा महाउत्सव. दिवाळी म्हणजे सणांचा राजा. ही संपूर्ण स्वप्नपूर्तीची परंपरा आपण वर्षो नी वर्षो अविरत करत आहोत.
दिवाळी ही फक्त आनंद व्यक्त कारण्यापूर्तीच मर्यादित नसून ह्या सणाला व्यापारांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे. ह्या दिवसांपासून त्यांचे नवीन वर्ष सुरु करतात. नवीन संकल्प करून व्यापाराच्या भरभराटीसाठी नियोजन सुद्धा करतात.
ह्या वर्षाची दिवाळी ही सर्वांसाठी आवाहनात्मक आहे. विशेष करून शेतमजूर,फेरीवाले कामगार व कामगारांसाठी तर खूपच आवाहनात्मक आहे. ह्या दिवाळी सणाला गालबोट कोरोना महामारीने सुद्धा लावलेले आहे. त्यामुळे ह्या वर्षाची दिवाळी साजरी करतांना असंख्य प्रश्न व समस्या कामगारांपुढे मांडून ठेपले आहेत. ह्या समस्यांना सामोरे जाऊन त्यांना दिवाळी कशी साजरी करावी हे मोठे आवाहन त्यांच्या समोर येऊन ठेपले आहे.
अशा विविध एक नव्हे तर असंख्य समस्यांना सध्या ते सामोरे जात आहे व हा शेतमजूर,फेरीवाले कामगार मनोमनी स्वतःला प्रश्न विचारतो आहे की ही दिवाळी मी कशी साजरी करू ?
आपण दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा देतो. मनोकामना व्यक्त करतो की ही दिवाळी सुखमय जावो. सध्याची दिवाळी नेहमी सारखी नसून प्रत्येकासाठी आरोग्यदायी असावी ही प्रत्येकांसाठी एकमेकांविषयी सदिच्छा असेल.
दिवाळी म्हणजे बोनस. बोनस मिळाला की दिवाळी साजरी करतात. बोनस हा पगाराच्या व्यतिरिक्त मिळणार आर्थिक लाभ होय. बोनस केव्हा मिळतो तर जेव्हा एखादी कंपनी नफ्यात असते. नफा असला तर बोनस मिळतो. लॉक डाउन मुले रोजगार गेले. नौकऱ्या गेल्या. कामगार प्रांत सोडून गेले. कंपन्या बंद पडल्या. नेहमीच्या पगाराचे वांधे झाले तर बोनस कुठला ? मी ह्या कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा कशा देऊ ?
पगारदार वर्गाला बोनस मिळाला तर तो आनंदाने आपल्याकडे काम करणाऱ्याला स्वखुशीने बोनस देत असे.आज पगारदारच अडचणीत तर तो कामगारांना कसा बोनस देऊ शकेल ?
कष्टकरी जनता ही स्वकष्टानेच नेहमी उभी राहिलेली आहे. कामगारांच्याच रक्तात कष्ट भिनलेले आहे. ह्याच कष्टकरी जनतेला आपले पांघरून बघून पाय पसरण्याचे अगोदर पासूनचे संस्कार आहेत.
श्रीमंत होण्याचे बरेच मार्ग आहेत. तसेच सुखी व समाधानी होण्याचे सुद्धा मार्ग आहेत. गडगंज संपत्ती आहे पण सुख समाधान नाही असे आपण बरेच बघितले आहेत.
आपण असे ही बघितले आहेत ज्यांच्या कडे बरीच गरिबी आहे पण समाधान सुख हे सदैव चेहऱ्यावर खेळत राहिले आहे.
उत्पन्न वाढावा श्रीमंत व्हा. नाहीतर मग गरज कमी करा, मर्यादित ठेवा व समाधानी व्हा हा सुद्धा एक श्रीमंतीचा मार्ग आहे.
माणसाच्या गरजा कधीच पूर्ण होत नाहीत त्या वाढतच असतात. चला आपण ह्या दिवाळीला गरजा कमी करून दिवाळी सुख समाधानाने साजरी करूया. तसे कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविलेले आहे. अनाठायी खर्चावर मत करण्याचे आपण शिकलो आहे. लग्नामध्ये होणाऱ्या अनाठायी खर्चावर आपण मात करू शकलो आहे.
दर दिवाळीला फटाके फोडून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी गरीब मुलं आपण दिवाळीच्या रात्री फोडलेल्या फाट्याक्यातून न फुटलेले फटाके वेचणारे गरीब मुलं बघितले आहे व त्याला जर न फुटलेला फटका मिळाला व तो जर त्याने फोडल्याचा आनंद आपण बघितला तर दिवाळीच्या रात्री आपण फोडलेल्या फाटक्या पेक्षा जास्त आहे.
ना उमेदातून नवी उमेद निर्माण करणारा हा शेतमजूर व कामगार वर्ग ह्याची विशेषतः राहिली आहे. ह्या कामगार वर्गाची सर्वात मोठी उमेद ती म्हणजे कष्ट करण्याची जिद्द. कारण की त्याला माहित आहे की, आज ही जी पृथ्वी उभी आहे ती कामगारांच्या हातावर उभी आहे. कष्टकरी कामगार शिवाय जगाला पर्याय नाही.
चला आपण ह्या दिवाळीला ह्या कष्टकरी जनतेच्या मनामध्ये कष्टाचा व जिद्देचा दीप अधिक प्रज्वलित होण्याची मनोकामना व्यक्त करूया.
दिवाळीच्या शुभेच्छा देतांना.
अरविंद सं. मोरे, नवीन पनवेल पूर्व मो.क्र.९४२३१२५२५१.