अमरावती : धारणी आदिवासी भागातील जळीत प्रकरनात प्रत्यक्ष भेट देऊन खासदार नवनीत रवी राणा यांनी रविवार दिनांक22 नोव्हेंबर रोजी सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना सोबत घेऊन चौकशी केली आजूबाजूच्या नागरिकांसोबत संवाद साधला , त्या नंतर उपस्थित असलेल्या मिताली सेठी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी धारणी, सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, तहसीलदार आदिनाथ गांजरे, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी पानझाडे ,उप कार्यकारी अभियंता वीज वितरण विभाग चे तायडे, वनविभागाचे आदी अधिकारी यांची वरील प्रकरणी बैठक घेवून आदिवासी, गोरगरीब, सर्व सामान्य लोकांच्या त्यांच्या कामाप्रति समाश्या जाणून घेतल्या त्या वेळी अधिकाऱ्यांचा आढावा घेत असतांना खासदार नवनीत राणा यांचे असे लक्षात आले की प्रकल्प ऑफिस मधील,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वनविभागाचे अधिकारी, व इतर विभागाचे अधिकारी एकाच कामासाठी आदिवासी, गोर गरीब जनतेला 10 वेळा ऑफिस मध्ये बोलवतात त्यांची दिशाभूल अधिकारी करतात त्यामुळे आदिवासी घटकांचा विकास थांबला आहे.सरकार चे योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही गोरगरीब मंडळी सरकारी योजनेपासून लाखो दूर आहे. ज्यामुळे खासदार नवनीत रवी राणा बैठकीत संतप्त होऊन सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरले अधिकाऱ्यांचा क्लास घेत खासदार राणा यांनी आपल्या भाषेत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना सुनावले की याच्यानंतर जर गोरगरीब, आदिवासी, सर्व सामान्य जनता यांच्या तक्रारी माझ्या प्रेयन्त आल्या तर अश्या अधिकाऱ्यावर सक्त कारवाई करणार.असा दम खासदार यांनी दिला.धारणी येथील दुकाने जळालेल्या स्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांचे कडून बैठकीत माहिती घेत असतांना जर अधिकाऱ्यांनकडून दुकानदार, व्यावसायिक यांची जर मुख्याधिकारी वेळीच नोंद घेतली असती किंवा त्या पद्धतीने कारवाई केली असती तर कदाचित अश्या घटना घडल्या नसत्या, किंवा त्यांना लाभ देण्यासाठी सोयीचे झाले असते. अधिकाऱ्यांचे हलगर्जीपणा मुळे अश्या घटना घडतात आता तरी या पुढे या घटनेचा अनुभव घेऊन अधिकाऱ्यांनी आपल्या चुका सुधारा. असा धडा खासदार नवनीत राणा यांनी बैठकीत शिकवला , खासदार, अधिकारी यांचे बैठकीत आदिवासी विकास योजना, शेतकऱ्यांना मिळणारे कृषी योजनेचा लाभ, वनविभागाचे सबंधी योजना नागरींकाचे समश्या, आदिवासी खावटी योजना, आरोग्य बाबतीत सुख सुविधा पाणी पुरवठा इत्यादी आदी विषयावर बैठकीत चर्चा झाली.मिताली सेठी उपविभागीय अधिकारी, व निकेतन कदम सहाययक पोलीस अधीक्षक यांचे चांगल्या कांमाबाबतीत नवनीत राणा खासदार यांनी प्रशंसा करून नोंद हि घेतली. खासदार चांगल्या कामाचे मूल्यमापन करतात हे सुध्दा या वरून दिसले.खासदार यांचे निर्देशानुसार उमेश ढोणे यांनी बैठकीची कार्यवृत्तटिप्पणी संबंधित अधिकारी यांचे कडून मागितली आहे.
या महत्वाचे बैठकीला युवा स्वाभिमान पार्टी चे जबाबदार धारणी तालुक्यातील पदाधिकारी ज्या मध्ये उपेंद्र बचले संपर्क प्रमुख मेळघाट, दुर्योधर जाजरकर, शहर शबारे, जौशिक भाई, पिरोकभाई, सीलदार आदिनाथ अब मनीष मालवीय, मेळघाट संपर्क गोस्वामी, . मेळघाटच्या गांजरे, नगरपंचायत मुख्याधिकारी प्रमुख शिबानी केंद्र, जिल्हाध्यक्ष देवेंद्र जलतारे, मंगेश कोकाटे, राहुल काळे टीम, महासचिव मुकेश मालवीय, व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
Contents
hide
Related Stories
November 22, 2024