नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत आज शिक्षण मंत्रालयाच्या विविध योजना आणि कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला . उच्च शिक्षण सचिव अमित खरे, शालेय शिक्षण सचिव अनिता करवाल आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
सर्व शिष्यवृत्ती आणि अभ्यासवृत्ती वेळेवर प्रदान करण्याचे आणि त्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारींचे निवारण तातडीने करण्याचे निर्देश पोखरियाल यांनी विद्यापिठ अनुदान आयोगाला दिले.
मातृभाषेत तंत्रज्ञान शिक्षण विशेषतः अभियांत्रिकी अभ्यासक्रम देणारे शिक्षण हे पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा अंतिम निर्णय झाला असून काही IIT आणि NIT ची नवे यासाठी निश्चित झाली आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि देशातील शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यथास्थित अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयाचे सर्व कर्मचारी काम करत आहेत असे पोखरियाल यांनी सांगितले.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात “राष्ट्रीय चाचणी यंत्रणा”, देशातील विविध शिक्षण मंडळांमधील सद्यस्थितीतील पद्धतींचे पृथक्करण केल्यानंतर स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासक्रमाची घोषणा करेल तसेच पुढील वर्षाच्या परिक्षा कधी आणि कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात याविषयी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी शिक्षण मंत्रालय एक मोहीम सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला आहे.
Contents
hide
Related Stories
November 22, 2024