चांदवडी रुपय्या प्रतिष्ठान संचलित ‘चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळ’ आयोजित पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा २०२२ नुकताच दि. ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी पार पडला. या सोहळ्याचे आयोजन चांदवड येथील सार्वजनिक वाचनालय शिवाजी चौक, चांदवड येथे करण्यात आले होते. अध्यक्ष डॉ राजेंद्र मलोसे, प्रमुख पाहुणे म्हणून कवी शिरीष गंध्ये, जेष्ठ लेखक व साप्ताहिक अभिनव खान्देशचे संपादक मा. प्रभाकर सूर्यवंशी, चांदवडचे वैभवशाली व्यक्तिमत्त्व व अनेकांना गुरू म्हणून लाभलेले डॉ सतीश पिंपळगावकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत लेखिका, तथा कवयित्री मा सौ. सविता दरेकर यांच्या ‘काळजातला लामणदिवा’ या कादंबरीचे प्रकाशन झाल.. ही कादंबरी मला अजुन मिळालेली नाही तसेच कादंबरीचे वाचन अजुन करायचे आहे. मात्र त्याचे मुखपृष्ठ समोर आल्याने या मुखपृष्ठावरचे संदर्भ मला खुप भावले आणि त्यावर लिहण्याचा मोह मला आवरता आला नाही.
● हे वाचा – आयुष्याच्या वाटेवर,अनुभव संपन्न कविता संग्रह
अत्यंत अर्थपूर्ण आणि विविध संदर्भ घेउन मुखपृष्ठकाराने या कलाकृतीला जीवंतपणा दिला आहे. कोणतीही साहित्य कलाकृती असू दया, त्या कलाकृतीत काय साहित्यिक दर्जा आहे यापेक्षा त्या कलाकृतीचे मुखपृष्ठ आपल्याला त्याचा साहित्यिक दर्जा दाखवून देत असतो. म्हणतात ना, ‘घराची कळा अंगण दाखवत असते’ तसे एखाद्या कलाकृतीचा साहित्यिक दर्जा त्याचे मुखपृष्ठ दाखवत असते. असेच विविध अर्थाने सजलेले ‘काळजातला लामणदिवा’ या कलाकृतीचे मुखपृष्ठ सौ. सविता दरेकर यांच्या कादंबरी या कलाकृतीचे अंतर्रंग मला दर्शनी दिसले त्याचा अल्पसा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न. या मुखपृष्ठावर काळोख दाखविला आहे, समोर सूर्य अस्ताला गेलेला दिसत आहे, दिवा लागणीची कातरवेळ दिसत आहे. एक लामणदिवा दिसत आहे, त्याला सात पणत्या पेटत्या दिसत आहे. आणि या दिव्याचा मध्यभागातून एक वयस्क व्यक्ति त्या दिव्याच्या बाहेर येत आहे. तो लामणदिवा अधांतरित आहे. त्याच्या खाली ‘काळजातला लामणदिवा’ हे शीर्षक विशिष्ट आकारात लिहले आहे आणि त्याखाली सविता दरेकर इतकेच आपल्या दिसते. मात्र या सर्व संदर्भाचा जर बारकाईने विचार केला तर ‘मानवी जीवनाच्या जगण्याचा अर्थ’ यात लपलेला आहे. यावर आपण एकेक बाब आधी विचारात घेऊ.
● हे वाचा – एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!
सर्वात प्रथम या मुखपृष्ठावर काळोख दाखवला आहे. याचा अर्थ असा की- मानवी जीवनात अनेक संकटे येत असतात, ही संकटे एखाद्या काळोख्या रात्रीसारखी मनात अंधार करीत असतात. आज ना उद्या आपल्या जीवनात प्रकाश येइल, जीवनातील अंधार नाहीसा होउन पुन्हा नवा दिवस येइल या आशेवर मनुष्य दैनंदिन जीवन जगत असतो. या अंधारातून मार्ग काढता आला पाहिजे.. सूर्य अस्ताला जाताना दिसत आहे याचा अर्थ आपला देह, ही काया हळूहळू वार्धक्याकडे झुकत आहे, या कलत चाललेल्या जीवन प्रवासात आपण सत्कार्य केले पाहिजे, आपल्या हातून चांगले सत्कर्म झाले पाहिजे, ही जीवनातील महत्वाची बात आहे. सूर्यासोबतच मुखपृष्ठावर असलेली वृद्ध व्यक्ती काळोखाच्या दिशेने निघालेली आहे. तसेच ती व्यक्ती एका दिव्याच्या मध्यभागी उभी असून तो दिवा एका कमकुवत साखळीला लटकवलेला दिसत आहे. या दिव्याला ‘सात’ वाती पेटलेल्या दिसत आहे. याचा अत्यंत गहन अर्थ मला यातून भावला आहे. मी मुखपृष्ठकार आणि प्रकाशक तसेच कादंबरीकार या सर्वांना हजारदा सलाम करतो की, किती ही व्यापक कल्पनाशक्ती ! या कल्पनाशक्तीला जोड़ नाही. मानवी जीवनाचे रहस्य या मुखपृष्ठावर रेखाटले आहे. या तिनही जणांचा मानवी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक दिसून येतो. यातील जो दिवा आहे तो म्हणजे नरदेह, मानवी काया आहे आणि ही काया एका दिव्याच्या रुपात आहे. अशा या देहात ‘सहा’ वाती पेटलेल्या आहेत या वाती म्हणजे मनुष्यप्राण्यातील षड:रिपू आहेत. हे षड:रिपू फक्त आणि फक्त मानवात दिसून येतात. इतर प्राणीमात्रात हे दिसून येत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे सहा षड:रिपू मानवी मनात कायम पेटलेले असतात. आणि ‘सातवा दिवा’ हर्ष दर्शवतो.
● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य
- काम – म्हणजे माणसाच्या मनात सतत निर्माण होणा-या इच्छा मग त्या कोणत्याही असून, चांगल्या वाईट, वासना , लैंगिक भावना अशा कोणत्याही इच्छा.
- क्रोध – राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रु . माणसाने नेहमी या क्रोधावर नियंत्रण ठेवले पाहिजे. ज्याने क्रोधावर नियंत्रण ठेवले तो सर्वात सुखी.
- लोभ – मानवी मन सतत कोणत्या ना कोणत्य गोष्टीचा हव्यास करीत असतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे अशी इच्छा मनात ठेवत असतो, हा लोभ एक शत्रु आहे.
- मोह – मोह म्हणजे नको त्या गोष्टीचा आवड निर्माण करणे , एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नाही हे माहिती असुनही त्याचा आग्रह धरणे म्हणजे मोह उत्पन्न होणे.
- मद – मद म्हणजे गर्व , आपण त्याला घमंड देखील म्हणतो .. माणसाला नेहमी आपल्या जवळ असलेल्या वस्तुचा, पैशाचा,संपत्तीचा, सौंदर्याचा, ताकदीचा गर्व होत असतो.
- मत्सर – नेहमी इतरांना कमी लेखने, त्याचा राग राग करणे, त्याच्याबद्दल मनात जळावू वृत्ती ठेवणे, दुस-याची प्रगती सहन न होणे.
● हे वाचा – Rahul Gandhi : राहुल, संतांच्या पवित्र भूमीत तुझे स्वागत करतांना ……..
आणि सातवा दिवा ‘हर्ष’ म्हणजे आनंदाचा, अति आनंद देखील मानवाला घातक आहे अशा प्रकारचे सहा षड:रिपू मानवी देहात असतात, हे षड:रिपू जोपर्यंत तुम्ही मनातून काढून टाकत नाही तोवर शरीर त्यात जळत राहणार. जोवर त्याची दोरी म्हणजे त्या लामणदिव्याला बांधलेली साखळी मजबूत आहे तोवर मानव जगु शकतो , म्हणून ती मुखपृष्ठावर साखळी नाजुक दाखवली आहे. ती जर का तुटली म्हणजे मानवाने या षड:रिपूवर जर विजय मिळवला नाही तर ती दोरी तुटणार आणि हा नरदेहातून आत्मा बाहेर जाणार म्हणजेच माणसाला मृत्यु येणार. म्हणतात ना जोवर परमेश्वर वरून दोरी कापत नाही तोवर काया सलामत. त्यामुळे या *षड:रिपूचा अतिरेक नको हा संदेश यातून दिला असावा* असे मला वाटते.
● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!
तसेच या मुखपृष्ठावर आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ‘काळजातला लामणदिवा’ ही जी अक्षरे लिहली आहेत ती थोडीसी वेगळ्या ढंगात , वेगळ्या आकारात घेतली आहे. याचा अर्थ असा की, कादंबरीकार या हळव्या मनाच्या आहेत. त्या इतरांबद्दल संवेदनशील होतात, त्यांच्या भावना समजुन घेण्याचा प्रयत्न करतात . कधी कधी पाण्यात तरंग उठावेत तसे मनात तरंग उठत असतात त्यामुळे जी मानवी मनाची दोलायमान अवस्था होते तो तरंग , ती अवस्था प्रतिकात्मक रुपात दाखवण्याचा प्रयत्न केला असावा असे मला वाटते. कादंबरीकार सविता दरेकर यांच्या काही लिखाणात तसा संदर्भ आढ़ळून आला आहे. एका लेखात त्यांनी म्हटले आहे की,
● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधन
“जगू द्यावं ज्याचं त्याला”आपापल्यापरीने स्वतःसाठीचे काही क्षण.फक्त आपला परीघ ओलांडताना वाहत न जाता आपली सुरक्षा, प्रगल्भता आणि आपली स्पेस तेवढी जपता यायला हवी..!”’आयुष्याचं गणितही असंच असतं ना… घरात, बाहेर, समाजात वावरताना किती जणांना तोंड द्यावे लागते…कधी कुणी पाठीशी उभे रहाते तर कधी मनामनात अंतर पडून निराळ्या वाटेनं प्रवास सुरू होतो…’शेवटी मुखपृष्ठावर फक्त ‘सविता दरेकर’ असे साध्या अक्षरात लिहले आहे याचा अर्थ असा की, माणसाने आपले राहणीमान साधे ठेवावे, आपल्या विचारात, आचारात, वागण्यात, बोलण्यात, चालण्यात साधेपणा असावा असा संकेत दिला असावा. तसेच मलपृष्ठावर जेष्ठ लेखक डॉ.राजेन्द्रजी मलोसे यांच्या प्रतिक्रिया नवोदित लेखकाला पाठबळ देणा-या आहेत.
तुर्तात इतकेच…..!मा कादंबरीकार सविता दरेकर, मुखपृष्ठकार अरविंद शेलार, प्रकाशक परिस पब्लिकेशन पुणे यांना पुढील दर्जेदार साहित्य कलाकृतीसाठी शुभेच्छा ….’काळजातला लामणदिवा’ ही साहित्य कलाकृती वाचकांना परमोच्च आनंद देवो या शुभकामना देतो … नजरचुकीने काही संदर्भ चुकले असतील, काही त्रुटी असतील तर वाचकांनी माफ़ करावे. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ
- धन्यवाद.!
- -प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
- संपर्क – तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–
मा कादंबरीकार आणि मुखपृष्ठकार यांच्या कल्पकतेला सलाम. मा संपादक, गौरव प्रकाशन यांना धन्यवाद