र्जनल ऑफ फिजिओलॉजिकल सोसायटीमध्ये प्रसिद्ध संशोधनानुसार, शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी व अन्य रोगांचा धोका कमी होण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याची गरज असते. वयामुळे किंवा व्यायामादरम्यान घाम निघाल्यामुळे शरीर पाण्याची पातळी अँडजस्ट करत नाही. त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो.
वयस्करांमध्ये डिहायड्रेशनमुळे हीट लॉस कमी होत नाही किंवा शरीराचे तापमान वाढत नाही. न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई स्कूल ऑफ मेडिसिनच्या न्यूरोसायन्स विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. निकोल अँवेना यांच्या मते, शरीर हाइड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी हा एक चांगला मार्ग आहे. सोडा किंवा इतर पेय पिल्यामुळे शरीराला त्या घटकांवर प्रक्रिया करण्यासाठी पर्शिम घ्यावे लागतात, पण शरीराला कोणताही फायदा होत नाही.
शरीराचे तापमान योग्यरित्या नियंत्रित केले नाही तर उष्माघात, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात. न्यूयॉर्कमधील ईस्ट साइड रिहॅबिलिटेशन अँन्ड नसिर्ंग सेंटरचे डॉ. नोडार जॅनस यांच्या मते, व्यक्तीची वयानुसार, कल्पित भागामध्ये तहान लागण्याची सक्रियता कमी होते. बर्याच वेळा मेंदू तहान भागविण्याचे संकेत पाठवत नाही.
Contents
hide
Related Stories
October 31, 2024
October 19, 2024
September 3, 2024