अमरावती : जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णामुळे परिस्थीती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सक्तीची कारवाई करण्यात येत आहे.मात्र तरीही कोरोना रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस फुगत चालल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ४८५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून जिल्हयात आतापर्यत २६ हजार २२८ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. मृतकांचा आकडा देखिल वाढत चालला असून तीन नवीन कोरोना बाधितांच्या मृत्यूसह आतापर्यत ४४२ कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. २४ हजार २७0 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असला तरी दाखल रुग्णांनी १ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
अमरावती जिल्हयात कोरोना रुग्णांविषयी रोजच धक्कादायक माहिती समोर येत असून रुग्णसंख्या अगदी तिव्र गतीने वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वाढत असलेला थंडीचा जोर आणि प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून होत असलेले उल्लंधन या दोन महत्वपूर्ण कारणामुळे कोरोनाचा मोठया प्रमाणात फैलाव होत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. रूग्ण संख्या वाढु लागल्याने शहरासह जिल्हयातील रूग्णालये व दवाखाने पुन्हा गच्च भरल्याचे दिसून येत आहे. जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाकडून सक्तीचे पाऊल उचलले जात असून त्रिसूत्री नियमांचे पालन न करणार्यांविरूध्द मोठया प्रमाणात कारवाईचा बडगा उचलल्या जात आहे.विशेष म्हणजे परिस्थती ही चिंताजनक असतांना सुध्दा रस्त्यावर फिरणारे नागरिक हे अदयापही नियमांचे पालन करतांना दिसून येत नाही.सातत्याने वाढत असलेल्या रुग्णामुळे पुन्हा लॉकडाऊनची स्थिती निर्माण होईल का ?असा यक्ष प्रश्न आता नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. कोरोनाचे सावट हे अमरावती शहरासह संपूर्ण जिल्हयात पसरले असून ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा आकडा देखिल दिवसेदिवस वाढत चालला आहे. १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ४८५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली असून जिल्हयात आतापर्यत २६ हजार २२८ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. मृतकांचा आकडा देखिल वाढत चालला असून तिन नविन कोरोना बाधितांच्या मृत्यूसह आतापर्यत ४४२ कोरोनाबाधित रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. २४ हजार २७0 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असला तरी दाखल रुग्णानी १ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
Related Stories
October 14, 2024