हटके फॅशन टीप्स

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

ऋतू बदलताना रूटीन लाईफमध्ये नवे रंग भरण्यासाटी काही हटके फॅशन टीप्स अनुसरता येतात-
पादत्राणांसोबतच अँटीट्यूड बदलण्याची वेळ आली आहे हे समजून घ्या. वूड किंवा ब्लॅक शेडमधले ब्लॉक हिल्स निवडा. ब्राइट रेड, ऑरेंज आणि गोल्ड हिल्स खास समारंभांसाठी योग्य ठरतील. स्टेटमेंट नेकलेसला बाय बाय करून त्याऐवजी छानशा स्कार्फला नेकलेसचा लूक द्या. सध्या स्कार्फची फॅशन हिट आहे. उन्हाळ्यातही तुम्ही अगदी सहज स्कार्फ कॅरी करू शकता. स्टायलिश आणि बारीक नक्षीकाम केलेले स्कार्फ निवडा. कल्पकता वापरून वेगवेगळ्या पद्धतीने स्कार्फ बांधू शकता. सध्या मोठय़ा फ्रेमच्या, रंगीत स्पेक्टसची चांगलीच चलती आहे. तुमच्या चेहर्‍याला सूट होतील, अशा फ्रेम्स निवडू शकता. हा लूक अगदीच हटके दिसेल. ऑफिसला जाताना भली मोठी पर्स किंवा बॅग घेऊ न जायचा ट्रेंड आता जुना झाला. आता जमाना आहे फंक्शनल वर्क बॅग्जचा. भरपूर सामान मावतं म्हणून मोठय़ा बॅग्ज घेतल्या जातात. पण यंदा भरपूर कप्पे असणारी, वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध असणारी पर्स ट्राय करा. यासोबत त्यात की होल्डर, सुटे पैसे ठेवण्यासाठी कॉइन पर्स तसंच तुमचं नोटबुक किंवा आयपॅड ठेवण्याची सोय असलेल्या पर्स निवडा.

Leave a comment