अमरावती : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणार्या रुग्णांची संख्या मोठी असून, रुग्णांचा मृत्यू दर हा १.३९ इतका आहे. शनिवारी पुन्हा ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आतापर्यंत जिल्ह्यात ६२४ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमविला आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ३८0 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आली असून, आतापर्यंत ४४ हजार ९३८ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. ४ हजारपेक्षा जास्त रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू असून, ३९ हजार ८५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात डब्लिंग रेट हा ३२.५ इतका असून, रिकव्हरी रेट हा ८८.६८ इतका आहे.
जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णामुळे जिल्हा प्रशासनच नव्हे ते अमरावतीकरसुद्धा हैरान झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे जवळपास सर्वांचीच आर्थिक परिस्थिती ही तडजोडीपर्यंत येऊन ठेवली असून, रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना संक्रमनाचा कालावधी वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून नवीन निर्बंध लावण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांचेचे व्यवसाय हे ठप्प पडलेले आहे. प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे पालन करावे की स्व:ताच्या पोटा पाण्याचा प्रश्न हाताळावा, असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला असल्यामुळे अनेक नागरिक हे रोजगारासाठी धावाधाव करीत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. विशेषत: जनसामान्यांच्या रोजगारावर मोठय़ाप्रमाणात गदा आल्यामुळे आरोग्यासमोर रोजगाराला अनेक नागरिक प्राध्यान्य देत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. येणारी परिस्थिती कशी राहणार याचा अंदाज बांधने अशक्य असलेतरी अनेकांनी आता प्रशासनाने आखुन दिलेल्या निर्बंधावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. २0 मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३८0 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ४४ हजार ९३८ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. ३ रुग्णांच्या मृत्यूसह ६२४ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ४ हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू असून, ३९ हजार ८५२ रुग्णाना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात मृत्यूदर हा १.३९ इतका असून, ३२.५ इतका डब्लिंग रेट आहे. तर ८८.६८ इतका रिकव्हरी रेट आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024