कॅल्शियमच्या पर्याप्त पुरवठय़ासाठी..

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

आजकालच्या अनियमित दिनचर्येत आणि अनियमित आहारपद्धतीत कॅल्शियमची कमतरता ही अनेकांची समस्या बनलेली आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कमी वयातच अनेक शारीरिक समस्या भेडसावू लागतात. वयाच्या तिशीपर्यंत शरीर आहाराद्वारे आपली कॅल्शियम गरज सहज पूर्ण करुन घेतं मात्र त्यानंतर शरीराची क्षमता कमी होते आणि कॅल्शियमच्या अल्प पुरवठय़ाचे परिणाम दिसू लागतात. विशेषत गर्भवती महिलांना आणि स्तनपान देणार्‍या मातांना कॅल्शियमचा पर्याप्त पुरवठा व्हायलाच हवा. त्यादृष्टीने आहारात काही बदल करणं इष्ट ठरेल. एक कप पाण्यात आल्याचा कस घालावा. पाणी निम्म होईपर्यंत उकळावं. हा काढा दिवसातून एकदा घ्यावा. यामुळे कॅल्शियमची कमतरता भरुन निघते.
रात्री दोन ग्लास पाण्यात दोन चमचे जरे भिजवून ठेवावं. सकाळी हे पाणी उकळून दाट काढा करावा. गाळून दिवसातून एकदा हा काढा घेतल्यासही कॅल्शियमची गरज भागते.
कॅल्शियमची कमतरता असणार्‍यांनी आहारात बदामाचा वापर वाढवावा. रात्री चार बदाम आणि एक सुकं अंजीर पाण्यात भिजत ठेवावं. सकाळी अनशापोटी ते चावून चावून खावं. कॅल्शियमची कमतरता असल्यास आहारात मोड आलेल्या धान्याचं प्रमाणही वाढवायला हवं. दररोज सकाळी लिंबू पाणी पण्याचा नियम ठेवल्यास शरीराला कॅल्शियमचा पर्याप्त पुरवठा होतो. सोयाबीनच्या सेवनाने कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता दूर करता येते. मात्र युरिक अँसिडचा त्रास असणार्‍या रुग्णांनी हा उपाय टाळावा.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रुग्णांनी दररोज सकाळी दहा मिनिटे कोवळ्या उन्हात बसण्याचा नियम पाळावा. सकाळचा फेरफटका त्यांच्या शरीरातील व्हटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता दूर करु शकतो.

Leave a comment