“भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकरांचे विचार अन्यायग्रस्तांसाठी -“तेज – प्रकाश निर्माण करणारे”

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक १४ एप्रिल १८९१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर अपार कष्ट करून ज्ञानसाधना करून अनेक विषयात ज्ञानशांखावर त्यांनी प्रभुत्व संपादन केले याद्वारे त्यांनी स्वतःची शैक्षणिक उन्नती तर साधलीच अन्यायग्रस्त समाजासाठी त्यांनी मोलाचे अतुलनीय कार्य केले अशा लोकांसाठी त्यांनी त्यांच्यामध्ये चेतना,जागृती निर्माण करण्यासाठी विपुल लिखाण केले. जातीपातीचा विचार न करता सर्वांसाठी मानव कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. स्रियांच्या सन्मानासाठी केलेल्या कार्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येकाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करायलाच पाहिजे. *”वाचाल तर वाचाल,”* असा संदेश बाबासाहेबांनी दिल्यामुळे आज अन्यायग्रत्तांना गुलामगिरीच्या बेड्या तोडून ताठ मानेने जगायला भारतरत्न बाबासाहेबांनी शिकविले. अन्यायग्रस्ताच्या वाट्याला आलेले दुःखे बाबासाहेबांनी स्वतः अनुभवली होती त्यामुळेच ते आपल्या बांधवांना आत्मविकासाचा योग्य मार्ग दाखवू शकले.
जुन्याकाळी समाज अज्ञान, निरक्षरत: अनिष्ट रूढी परंपरा,अंद्रश्रद्धा, गरिबी अशा व्याधींनी समाज पोखरलेला होता, दुःखी होता. अन्याय, छळ, अपमान ,अशा जगण्याने समाजाचे रोजचे जीवन दुःखमय झाले होते. अशा समाज बांधवांची दुःखे डॉक्टर बाबासाहेबांनी पाहिले आणि स्वतःही अनुभवली होती. माझ्या बांधवांचें दुःख मी दूर करीन या हेतूने अनेक कार्य त्यांनी केले मानवतेच्या अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी अपार कष्ट करून मिळवून दिला.समाजउन्नतीसाठी त्यांच्या मध्ये चेतना, ऊर्जा निर्माण व्हावी या साठी अनेक महान ग्रंथ भारतरत्न बाबासाहेबांनी लिहून समाजासाठी उपलब्ध करून दिले. स्वतंत्र भारता साठी राज्यघटना लिहून भारतात लोकशाही राज्यव्यवस्थेचा मजबूत पाया घातला म्हणून आज भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र ठरले भारतरत्न बाबासाहेबांच्या कार्यामुळे भारत देश प्रशेंसेस पात्र ठरला. *”अश्या माझ्या भीमाची पुण्याई वर्णावी किती”* किती तरी लिहिले तरी कमीच पडेल अशा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमिताने *” तु फुकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर”
” तु तोडल्यास गुलामगिरीच्या पायातल्या बेडया त्या फक्त आणि फक्त ज्ञानाच्या बळावर “*
समाज मनाला उमेश म. ढोणे यांजकडून भिमजयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो.

-उमेश महादेवराव ढोणे –
महासचिव -अन्याय्यग्रस्त महाराष्ट्र राज्य कृती समिती.
मोबाईल📱 नंबर-९०४९०६७३३१

Leave a comment