व्यायामाचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यात सातत्य असावं लागतं. अनेकांना जीममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा कंटाळा असतो. असं असेल तर घरच्या घरी करता येण्याजोग्या व्यायामावर भर द्यायला हवा. याविषयी..
स्ट्रेचिंग- घरी वर्क आउट करत असाल तर स्ट्रेचिंग हा सर्वोत्तम प्रकार आहे. व्यायामाची सुरुवात स्ट्रेचिंगने करावी. यामुळे शरीर लवचिक बनून वर्क आउटसाठी तयार होते. पुश अप्स- पोटावर झोपा. दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवा. हात आणि पंजे यांच्या सहाय्याने शरीर वर उचला आणि खाली आणा. पुश अप्समुळे खांद्यांना मजबुती मिळते. फ्री स्क्वेट्स- सरळ उभं राहून दोन्ही हात समोर ठेवावेत. गुडघ्यांवर थोडासा भार देऊन शरीराला खुर्चीवर बसतानाच्या स्थितीत आणा. कंबर सरळ ठेवा. काही काळ या स्थितीत राहून पूर्वपदावर या. हँड स्टँड- याला अधोमुख वक्रासन म्हणतात. रक्तदाबाचा त्रास असणार्या व्यक्तींनी हा प्रकार करू नये. दोन्ही हात जमिनीवर ठेवून भिंतीच्या सहाय्याने खाली डोकं वर पाय या अवस्थेत रहावे. यामुळे तणावापासून सुटका मिळते.