शिकवी परंपरा आणि रूढी
विद्यावान, कलागुण संपन्न
जो घडवितो राष्ट्राची पिढी……
इतिहास ग्वाही देतो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अनामिक नात्याची, गुरु द्रोणाचार्य पासून ते साने गुरुजी पर्यंत ,आजतागायत शिक्षक या शब्दाला विशेष असे महत्त्व आहे….
शिक्षक म्हणजे सर्वगुणसंपन्न, कला पारंगत, सुस्वभावी व नीतिमत्ता जपणारा असा व्यक्ती डोळ्यासमोर उभा राहतो…
मास्तर ,गुरुवर्य, गुरु, शिक्षक, अशा विविध उपाध्या उराशी बाळगून ज्ञानार्जन करणारा या व्यक्तीला समाजशील असे कार्य दिले आहे, त्यानुसार त्याला ते मानाचे स्थान प्राप्त झाले.
कालानूपरत्वे त्याच्यामध्ये आधुनिकता आली असेल, बदलत्या जीवनशैलीने औद्योगीकरणाने त्याला बदलवले असेलही, पण शिक्षकाची नीतिमत्ता व निष्ठा अजूनही कायम आहे. भारतातील शिक्षण प्रणालीचा विचार करता शिक्षक शिस्तप्रिय ,नियोजन बद्ध , शीलवान असा असावा..
पूर्वी गुरुगृही जाऊन शिक्षण संपादन करायचे होते, पण change is the law of nature…. बदल हा निसर्गाचा नियम आहे ,त्याप्रमाणे हे आजचा आधुनिक शिक्षकही बदलला आणि त्याच्या शिक्षणाच्या पद्धतीही बदलल्या… खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ,याकडे त्याचा सध्याचा कल आहे..
पूर्वी शिक्षक आणि पालकही विद्यार्थ्यांच्या वार्षिक, शारीरिक व अध्यात्मिक विकासाच्या बद्दल प्रयत्नशील राहायचा, त्याप्रमाणेच अभ्यासक्रमाचे हे नियोजन केल्या जात होते. पण आता शिक्षकांपुढे वेगवेगळी आव्हाने समोर येत आहे… झपाट्याने झालेल्या बदलामुळे औद्योगिकरण, दळणवळण, इंटरनेट या विश्वामध्ये विद्यार्थी घडवणे, म्हणजे एक कलाच आहे, आणि त्याप्रमाणे शिक्षकाला ही मार्गक्रमण करावे लागत आहे. या संगणकीय युगात विद्यार्थ्यांचा बुध्यांक हा अधिक उच्चतम पटीने वाढत आहे, अगदी त्याप्रमाणे त्याचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यावर वेगवेगळी उपाययोजना व्हावी ,यासाठी शिक्षक व शिक्षण मंडळ प्रयत्नशील आहेत… विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये 0 ते 8 या वयोगटातील बालकांचा विचार करता, या अवस्थेमध्ये मुलांचे योग्य संगोपन होणे आवश्यक असते, त्यांच्या प्राथमिक अवस्थेमध्ये..
संवाद आणि भाषा कौशल्य
शारीरिक विकास
वैयक्तिक, सामाजिक व भावनिक विकास या… विकासाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये शिक्षकाने विशेष असे अवलोकन, अध्यापनाचे ट्रेनिंग घेतलेले असते ..आजच्या बदलत्या जीवनशैलीने त्याचा इतर विकासा सोबत भावनिक व मानसिक अवस्थेचा ही तितकाच प्रखरतेने विचार होणे आवश्यक आहे…
त्यानंतर बालकाच्या विशिष्ट विकासामध्ये जसे की वाचन आणि लेखन कौशल्य ,गणित बाह्य जग अवलोकन, कलाकौशल्य, विकासासाठी उपयुक्त अशा शिक्षण पद्धतीचा अवलंब करून योग्य पद्धतीने ज्ञानार्जन, नियोजन करणे, शिक्षकांना आवश्यक असते, संवाद आणि भाषा कौशल्य मध्ये तो उत्तम भाषा व आत्मविश्वास कसा वाढवू शकतो, तर त्याच्या शारीरिक विकासामध्ये व स्वतःला कसा बॅलन्स करू शकतो ,त्याचे आहारविहार, नियोजन व शारीरिक सवयी या सगळ्या गोष्टींचा यामध्ये विचार केला जातो…… त्याचप्रमाणे अभ्यासाव्यतिरिक्त त्याच्या इतर कला, कौशल्य, खेळ व्यायाम, सामाजिक विकास, या सर्वांचा विचार करावा लागतो. त्याच्या कलात्मक आणि क्रिटिकल विचारप्रणालीचा विकास झाल्यामुळे त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळतो…
प्राथमिक अवस्थेमध्ये मुलांना सामाजिक-सांस्कृतिक, भावनिक व ऐतिहासिक विषयाचे ज्ञान होणेही आवश्यक आहे. शिक्षकाने अध्यापन करताना खेळा आणि शिका या पद्धतीचा अवलंब केला तर विद्यार्थी अति उत्तम पद्धतीने कुठल्याच दडपणाखाली न राहता जास्तीत जास्त ज्ञानार्जन करू शकतो. एका विषय कडून दुसऱ्या विषयाकडे वळताना मध्ये एक ट्रांजेशन टाईम असणे आवश्यक आहे, तसेच बालकांच्या शारीरिक विकासाच्या अवस्थांचा अभ्यास करणेही आवश्यक आहे…
विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते हे अतिशय विश्वासाचे व निरोगी व स्वस्थ असावे, विद्यार्थाला आपल्या आई-वडिलांचा सोबतच शिक्षका जवळही मनापासून व्यक्त होता आलं पाहिजे….
असंच त्यांचं नातं सुदृढ आणि प्रेमाचं असलं पाहिजे.शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्पर्शज्ञान याचेही धडे द्यायला पाहिजे, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श काय असतो हे आपल्या विशेष कौशल्यातून समजावून सांगायला पाहिजे,
पालक, पाल्य आणि शिक्षक या तिहेरी संगमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येतो.त्यामुळे या तिघांचेही नाते घट्ट एकमेकांच्या भावनांशी जोडलेले असावे, गेल्या दहा वर्षापासून मी शिक्षकी पेशात आहे खूप सुंदर आणि आत्मिक अनुभव या लहान पण मनाने शुद्ध असणाऱ्या मुलांमध्ये मी माझं सर्वस्व शोधते, शाळा म्हणजे माझा मोकळा श्वास आहे …छोट्या मुलांकडूनही अपार आपुलकी, विश्वासआणि प्रेमआणि बरंच काही मिळवलेलं आहे. माझी खरी ओळख माझे विद्यार्थी आहेत, ज्यांच्यामुळे मला जगण्याची आणि आणखीन नवीन शिकण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे मला असं वाटते शिक्षक हा नक्कीच भारताच्या विकासाचा शिल्पकार आहे ,त्याच्या हातून न जाणे कित्येक पिढ्या घडतात.
विद्यार्थ्यांची प्रगती म्हणजेच शिक्षकाची खरी पावती असते.. आपल्या हातून एक पुण्याचे कर्म घडत असल्यामुळे ते अगदी मनापासून व प्रामाणिकपणे केले, तर ते कार्य नक्कीच सत्कर्मी व देशाच्या विकासासाठी मार्गे लागते. प्रत्यक्ष देशसेवा करण्यासाठी रणांगणावर जाऊन लढण्याची गरज नाही, आपली जबाबदारी व कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे म्हणजे देशसेवाच होय…. शिक्षकी पेशा मध्ये अप्रामाणिकपणा म्हणजे हा एक कलंक आहे. माझ्यामते शिक्षकाने नेहमी प्रामाणिक असायला पाहिजे…. जगात मानाचे स्थान प्राप्त शिक्षक वर्गाकडे भारताची पिढी घडवण्याचे कार्य आहे…म्हणजेच भारताचा विकास करण्याचे कार्य शिक्षकाकडे आहे……. आणि म्हणूनच तो विकसित भारताचा शिल्पकार आहे…..
– सौ शितल राऊत
अमरावती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊