- काय झाले कुणास ठाउक
- सारे झाले आपसूक भाउक
- देह असा लटकला तेंव्हा
- मृत किसानापरी गाव भाउक
- ……………………………..
- किसानाची दुःखरी गाथा
- किती उगाळावी रोज
- पाउस कसा उसवित जातो
- अन,हा आणतो त्सूनामी रोज
- ………………………….
- पिक भरात असता हा
- घेतो घास ना मुखिचा
- कितिक सोसावे त्याचे वार
- हा वाखा करी किसानांचा
- ……………………………..
- या निर्सगाला काय म्हणावे
- त्याचे तर मनमौजी राज
- व्यथित आपण सारे आज
- ना पिकीची मग पडते गाज
- ……………………………..
- दुःखभारली सांज कशी
- घूटमळते गाव शिवारात
- मेघ दाटले काळे कुट्ट
- होईल संहारी बरसात
- ……………………………..
- वेदनेचे कीनारे घेवून
- उध्वस्त करी हा घरदार
- पडतो आक्रस थेंब धार
- गाव शांत विझनात
- ……………………………..
- कौलात घरात अंगणी
- हा सर्वदूर विसावते पाउस
- कोणाला असे मरणाची
- ईथे नाहक ही हाउस.
- ……………………………..
- किती झेलावे त्याने
- भयकंपित कापरे वार
- मुक्तांगणि किसान मरतो
- खावूनी विष ते असरदार.
- ……………………………..
- – शिवा प्रधान
- अमरावती
- मोबा :7057605968