ऋतू बदलला की त्वचेची काळजी घेण्याची पद्धत बदलावी. थंडीत त्वचा कोरडी पडते, रॅश येतात. त्यामुळे काही उपाययोजना कराव्या.
थंडीत त्वचा टॅन होण्याची शक्यता असते. या टॅनिंगपासून वाचण्यासाठी त्वचेला योग्य एसपीएफ असणारं सनस्क्रिन लावावं. दिवसा घराबाहेर पडण्याआधी २0 मिनिटे सनस्क्रिन चेहर्यावर लावा. त्वचेचा ओलावा कायम राखणारं मॉश्चरायझिंग फेसवॉश वापरणं इज मस्ट. बाजारात अनेक मॉश्चरायझिंग फेस वॉश आहेत. या फेसवॉशमुळे चेहरा धुतल्यानंतरही कोरडा पडत नाही. चेहरा मऊ रहायला मदत होते. हा फेसवॉश तुमच्या त्वचेला पोषण देतो.
तुम्ही दिवसा घराबाहेर पडणार नसाल तर चेहर्याला हलकं मॉश्चरायझर लावा. यामुळे त्वचेतला ओलावा कायम राहील. मॉश्चरायझर हलकं नसेल तर तुमची त्वचा तेलकट दिसेल याची दखल घ्या. दिवसा कोरफड किंवा गुलाबमिश्रीत मॉश्चरायझरचा वापरही योग्य ठरेल. या काळात ओठ कोरडे पडतात. त्यामुळे आपल्या जवळ कायम लिपबाम बाळगा. हा बाम अगदी कुठेही लावता येईल. लिपबाम न लावल्यास तुमचे ओठ फुटू शकतील. अनेकदा ओठांमधून रक्तही येतं. त्यामुळे लिपबामचा वापर अनिवार्य आहे. लिपस्टिक लावण्याआधी लिपबाम लावा.