मुंबई : मागच्या दोन महिन्यांपासून सुरू असलेलेल्या संपावर अजुनही तोडगा निघाला नाही. राज्य सरकार आणि एसटी संघटनांमध्ये चर्चेच्या फेर्या होऊनही तोडगा निघाला नाही. दरम्यान परिवहन मंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी कर्मचार्यांना वेतनात वाढ करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु काही एसटी कर्मचार्यांनी याला मान्यता दिली नाही.
एसटी कर्मचार्यांना सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्यासाठी अल्टिमेटम देऊनही काही ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. त्यानंतर अखेर संपकरी एसटी कर्मचार्यांवर राज्य सरकारकडून आजपासून बडतर्फीची कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. गेले अनेक दिवस कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने महामंडळाने हे पाऊल उचलले आहे.
सोमवारपयर्ंत कामावर हजर रहा नाही तर कठोर कारवाईला सामोरे जावं लागणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी इशारा दिला होता. त्यानंतर देखील कामगार कामावर हजर राहिले नाही यामुळे राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे.