- ध्येयाकडे लक्ष । राही सदा दक्ष ।
- संपवितो यक्ष । मार्गतले ।।
- संकटावर चाल। सातत्याची ढाल ।
- विसरतो काल । तोचि पुढे ।।
- स्व बळ विश्वास । जाणतो जो खास।
- मिळे तया घास। यश रुपी ।।
- ध्येय मोठे उरी। प्रयत्न जो करी।
- यश त्याच्या दारी।भरी पाणी।।
- उडतो आकाशी।पाय जमिनीशी ।
- नाळ रे कष्टाशी । तो यशस्वी ।।
- सोशी खूप हाल ।चालू ठेवी चाल ।
- विजयाची शाल । तया अंगी ।।
- युवाचे सांगणे । सातत्य ठेवणे ।
- उद्दिष्ट गाठणे ।तुम्हा हाती।।
- -युवराज गोवर्धन जगताप
- काटेगाव ता. बार्शी
- जिल्हा सोलापूर
- 8275171227