मकरसंक्रांत दरवर्षी येते.आनंद घेवुन.तीळगुळ देवुन तीळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत आपण तिचं स्वागत करीत असतो.नव्हे तर हा आनंदाचा पर्वही साजरा करीत असतो.पण काही उचाट मंडळी या तीळसंक्रातीला गालबोट लावुन तीळसंक्रात फलाण्या गोष्टीवर आली असे उगाच बडबडत असतात. तीळसंक्रात आनंदाचा पर्व आहे.या दिवशी लोक आपल्या अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करीत असतात.तसेच जेवणासाठी जे ही पदार्थ बनवतात.त्या सर्व पदार्थात तीळ टाकतात.याचा अर्थ असा आहे की या तीळ टाकल्याने रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच.शिवाय तीळामुळे शरीरातील थंडीने निर्माण झालेली उर्जा भरुन निघते.
मृत्यु हे आपल्या जीवनातील अंतिम सत्य आहे.या मृत्युने प्राणीपक्षी,व वृक्षलता यांनाही सोडलेले नाही.जर माणुस मेलाच नाही तर नवीन जीव जन्माला कसा येणार? मग तो तीळसंक्रातीचा दिवस का असेना……माणसाने गावात सकाळी एखादा जीव मेलेला पाहिला रे पाहिला की बस झालं.तीळसंक्रात त्यावर गेली असे संगळे मंडळ मानते.खरं तर या दिवसापासुन सुर्य आपली दिशा बदलवत असतो.म्हणुन या दिवसाला महत्व आहे
.
तीळसंक्रातीचा गोडवा वर्षभर येत नसल्याने तीळसंक्रातीला तीळगुळ वाटल्यास वर्षभर माणुस गोडच बोलतो असाही एक भ्रामक समज.पण तसे काहीच नाही.माणसाच्या जीवनात जे दुःख असतं.ते दुःख एक दिवस तरी भासु नये.तसेच एक दिवस तरी आनंद मिळावा या उद्देशाने या दिवसालाच नाही तर सणांना पुजण्याची गरज आहे.निदान लोकांमधील शत्रुत्व कमी व्हावं,देवाबद्दलची आस्था जास्त व्हावी या उदात्त हेतुने असे पर्व आम्ही दरवर्षी साजरे करतो.करायलाही हवेत.तीळगुळ आपल्या शत्रुंनाही द्यायला हवा.आपले शत्रुही आपले मित्र असतात.
तुम्ही खरंच शत्रुवर प्रेम करा.शत्रु आपला दूरचा मित्रच असतो.त्याच्या वाईट बोलण्याने आपण सावध होतो.धोका फक्त फितुरांमुळे होतो.आपलाच माणुस आपल्या पोटात केव्हा खंजर टाकेल ते सांगता येत नाही.केवळ द्वेषामुळे.ते जर तीळसंक्रातीच्या दिवशी घडत असेल तर यात संक्रातीचा दोष नाही.दोष आपला आहे.आपल्या अतुट विश्वासाचा आणि आपल्या विश्वासघातकीपणाचा…….आपण आपल्याला न शोभणारे,काळीमा फासणारे कृत्य जर या दिवशी करत असेल आणि त्यातुन पशु पक्षी,वृक्षलता,मनुष्यप्राणी यांचा जीव जात असेल तर त्याला काय म्हणावे?
अलिकडे आपण अन्नाची किंमत न करता,पोटाला लागेल तेवढे न बनवता जास्तीचे जेवण बनवतो.ते प्लास्टिक मध्ये टाकुन कच-याच्या ढिगा-यावर फेकतो.ते अन्न प्लास्टिकसह कुत्री,गाय,म्हैस इत्यादी प्राणी खातात.अशा प्राण्यांना विकार जडतात.हे प्राणी जर संक्रांतीला मरत असतील तर त्यात दोष संक्रातीचा नाही.तुमचा आहे.अन्न तेवढेच बनवा.जेवढे तुम्हाला लागते.उगाच जास्त बनवून संक्रातीच्या आनंदाच्या पर्वाला विरंजन घालू नका.तीळगुळ घ्या.शत्रुलाही द्या.तसेच गोडगोड बोला.वर्षभर.मतभेद विसरा.शत्रुत्वही विसरा.अंधश्रद्धाही विसरा.जसा या दिवसापासून सुर्य आपल्या परिभ्रमणाची दिशा बदलवतो ना.तसे तुम्हीही तुमच्या परिवर्तनासाठी तुमच्या विचाराची दिशा बदला.त्यातच तुमचं भलं आहे.
- -अंकुश शिंगाडे
- ९३७३३५९४५०