साधी राहणी उच्च विचारसरणी तथा शांत स्वभावी,नागपूरचे विभागीय सहसचिव. आदरणीय श्री.श्रीराम चव्हाण साहेब यांच्या जन्मदिनी मला लिहण्याची संधी मिळाली हे मी माझे अहोभाग्य समजतो,चव्हाण साहेब म्हणजे साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण. हे कोणीही सांगू शकेल यात काही शंकाच नाही.कितीतरी वर्षापासून दिनविशेष, प्रेरणादायी सुविचार सकाळच्या रम्य प्रहरी न चुकता साहेब वॉट्सॲप च्या माध्यमातून आम्हा सर्वापर्यंत पोहोचवतात त्या प्रेरणादायी सुविचार मुळे आम्हाला एकप्रकारची ऊर्जा मिळते आमचा दिवस आनंदात जातो.साहेबांच्या या नित्य उपक्रमामुळे चांगले विचार आत्मसात करण्याची सवय आम्हाला जडली आहे.. जो व्यक्ती साहेबाच्या सानिध्यात आलेला आहे.तो व्यक्ती साहेबांच्या विचार सरणी आत्मसात करून यशो शिखरावर पोहचलेला आहे..
त्या पैकी मी एक. साहेबांनी माझ्या अंतरंगातील कलेला ओळखून सृजनात्मक कलेच्या विशाल सागरात मला रममाण करून दिल्यामुळे आज मी कलाशिक्षक, लेखक,कवी,सुलेखनकार, व क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून महाराष्ट्रात हजारो लोकांपर्यंत पोहोचलो आहे.साहेबांनी माझच नाही तर कितीतरी गोर गरीब सुशिक्षित तरुणांना मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवून त्यांचे आयुष्य फुलविले आहे…उच्च पदस्थी असूनही अत्यंत साधी राहणीमान असणाऱ्या व उच्चकोटी विचार सरणी असलेल्या साहेबांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील वागद तांडा ( राजीव नगर) येथे श्री खिरू चव्हाण व सीताबाई चव्हाण यांच्या पोटी 1जून 1965 रोजी झाला.
एकूण दहा भावंडं (सहा बहिणी चार भाऊ.) चार बहिणी मोठ्या अठरा विश्व दारिद्र्य मूळ गावात 3री पर्यंत शिक्षणाची सोय तेही मोलमजुरी करून शिक्षण पूर्ण करावं लागलं साहेब शिक्षणात फारच हुशार होते अशी माहिती साहेबांच्या कुटुंबियांकडून मिळाली. पुढील शिक्षणासाठी वसतिगृहात राहून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.उल्लेखनीय म्हणजे साहेब पदवी चे शिक्षण घेत असताना अमरावती विद्यापीठातून मेरिट आले आहे.आणि पुढे मराठी विषयात एम. ए. करून बी. एड.केले.त्या गावातील ते पाहिले बी. एड. झालेले तरुण ठरले होते हे विशेष…
1 जुलै1987 ला फुलसावंगी जिल्हा यवतमाळ येथे शिक्षक म्हणून रुजू झाले.त्याच काळात मराठवाड्यातील श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील इवळेश्वर येथील प्रतिष्ठित नागरिक श्री गोपा भगू जाधव यांच्या सुकन्या सौ कुसूम सोबत लग्न झाले. माध्यमिक शिक्षक म्हणून काही वर्ष कार्य केले. नंतर यवतमाळ येथे ज्युनिअर कॉलेज मध्ये अधिव्याख्याता ,वरिष्ठ कॉलेज अधिव्याख्याता व अमरावती येथे डी.एड.कॉलेज अधिव्याख्याता म्हणून यशस्वी कार्य केले आहे.पुढे शिक्षण विस्तार अधिकारी,प्रशासन अधिकारी,घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे उत्कृष्ठ कार्य केले आहे .
साहेबाला शिक्षणाची आवड,जिद्द,चिकाटी ही आधीपासून होती त्यात घर सांभाळण्यात अर्धांगिनी सौ कुसूम बाईचा साथ साहेबाला खूप लाभला सुसंस्कृत घराण्यातील पत्नी लाभल्यामुळे साहेबाला पुढे खूप काही करण्याची इच्छा निर्माण झाली असावी..त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर साहेब 1994 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा खुल्या संवर्गातून उत्तीर्ण झाले.नागपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागात पंचायत समिती भिवापूर येथे गट शिक्षणाधिकारी म्हणून साहेबांची प्रथम नियुक्ती झाली. भिवापूर पंचायत समिती शिक्षण विभागात काम करत असताना वेग वेगळे उपक्रम राबविले उपक्रमात स्वतः सहभाग घेऊन शिक्षकाचा उत्साह वाढवला. विविध यशस्वी उपक्रम राबवून राज्यात भिवापूर चे नाव नोंदवून दिले. सात शैक्षणिक विभागांपैकी सहा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व एका स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. दृष्टीदोष कार्यक्रमामध्ये भाग घेऊन सतत दोन वर्ष प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी वर्षात लोकवर्गणीतून एक लाख रुपये गोळा करून साहेबांनी दत्तक योजनेमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. साक्षरता अभियान कार्यक्रम अंतर्गत अनेक खेडो पाडी कलापथकाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली आहे.उत्कृष्ट कार्य केल्यामुळे विविध पदकानी साहेबाना सन्मानित करण्यात आले आहे.
पुढे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद नागपूर येथे साहेबांची बदली झाली आणि साहेबांनी कार्यालयीन कामकाजा सोबत समाजाच्या सांस्कृतिक समारंभात विशेष कार्य केले आहे. माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, वसंतराव नाईक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, साने गुरुजी यांच्या विचारांचा प्रभाव साहेबांच्या वागण्यावरून,बोलण्यावरून नेहमी येतो.
शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करत असल्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून साहेब सर्वत्र परिचित झाले आहेत. साहेबांनी काही काळ निरंतर शिक्षण विभागात कार्य करून त्या क्षेत्रातही चांगला ठसा उमटवला आहे.सहाय्यक संचालक म्हणून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.येथे काहीकाळ कार्य केले आहे.नंतर नागपूर विभागीय सहायक सचिव सोबत शिक्षण उपनिरीक्षक( विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय) हा अतिरिक्त कार्यभार साहेबांनी चोख सांभाळला.
काही काळ नागपूर विभागीय सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार साहेबांनी सांभाळले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ नागपूर येथे सध्या विभागीय सहसचिव म्हणून साहेब कार्यरत आहे. उपक्रमशील अधिकारी म्हणून साहेब नेहमी अग्रेसर असतात.अभ्यासू वृत्ती,उत्तम वक्ता म्हणूनही साहेबांची आज ओळख आहे..दरवर्षी होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी, शिक्षक, पालक हेल्पलाईन च्या माध्यमातून सकारात्मक मार्गदर्शन आणि समुपदेशन साहेब करत असतात. विभागातील सर्व शाळांमध्ये साहेब आज सुपरिचित आहे.
सर्व सेवा अतीउत्कृष्ट असून साहेब सेवानिवृत्ती च्या उंबरठयावर असल्यामुळे” मराठी साहित्यिकांचा कोश” या संदर्भ ग्रंथाचे लेखन साहेबांचा हातून यद्ध पातळीवर सुरू आहे. भविष्यात सेवानिवृत्ती नंतर मराठी साहित्यिकांवर काम करण्याचा साहेबाचा माणस आहे..साहेबाना क्रिकेट खेळात प्रचंड आवड असून ते स्वतः आजही क्रिकेट खेळतात. साहेब आपल्या मूळ गावाशी नाळ घट्ट जोडून ठेवलेली आहे गावातील लोकांशी साहेबांचा जिव्हाळा आजही कायम आहे..गावात होणाऱ्या सण समारंभात साहेब परिवारासहित उपस्थित राहतात. साहेब व तिन्ही भाऊ मूळ गावी गेले म्हणजे कुटुंबा सहित एकोप्यानेच राहतात हे विशेष… साहेबांचे एक ब्रीद वाक्य “तुम्ही दुसऱ्याचं चांगलं करा तुमचं नक्कीच चागलं होईल”
साहेबांना दोन मुली व एक मुलगा आहे दोन्ही मुली विवाहित असून मुलगा अविवाहित आहे. त्यापैकी मोठी मुलगी सौ स्नेहश्री ही बी. ई. झाली असून जावई अभियंता आहे..दुसरी मुलगी सौ गौरवी ही एम. टेक. झाली असून जावई आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून. कार्यरत आहे.. मुलगा कौस्तुभ नागपूर येथे एका शाळेत कार्यरत आहे..मुले घडविण्यात व घर सांभाळण्यात साहेबांच्या पत्नी सौ कुसूम चव्हाण यांचा सिंहांचा वाटा आहे.
- संपर्क:श्रीराम चव्हाण (विभागीय सहसचिव)
- 9822695372
- chavhansk65@gmail.com
- साहेबांच्या वाढदिवशी एवढच सांगावस वाटेल..
- साहेब तुमच्या आयुष्यात आनंद व सुख लाभो.
- हाती घेतलेल्या संदर्भ ग्रंथाच्या लेखन शैलीला भरभरून यश मिळो.
- तुमचे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो.
- त्याचा सुगंध तुमच्या जीवनात सदैव दरवळत राहो..
- हीच तुमच्या वाढदिवशी ईश्वरचरणी प्रार्थना..
- साहेब आपणास वाढदिवसाच्या मनापासून कोटी कोटी शुभेच्छा..!
- -सुरेश बा.राठोड
- (कलाशिक्षक)
- राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर.जिल्हा नागपूर
- 9765950144