- प्रिय पर्यावरण,
- सप्रेम नमस्कार वि.वि.
आज रविवार ५ जूनला तुझा जागतिक पर्यावरण दिवस असून धुमधडाक्यात साजरा होत आहे. हो करायलाच हवा म्हणा. आमच्या सर्वांचे जीवन तर तुझ्यावरच अवलंबून आहे. आम्हा साऱ्या सजीवांना आमच्या जीवन संघर्षासाठी आणि आमच्या उत्क्रांतीसाठी तुझ्याशी जुळवून घ्यावे लागते अथवा त्या करता अनुकूल असे बदल घडवून आणावे लागतात. जे तुझ्याशी जुळवून घेत नाहीत ते नष्ट होतात. जो कोणी बदल स्वीकारतो तोच तग धरून राहू शकतो.
- तुझे आणि आम्हा मानवाचे परस्पर संबध नेहमी बदलत असतात. तुझे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे आणि ते प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
- पर्यावरण हा एक प्रकारचा भौगोलिक वाद आहे त्या द्वारे बाह्य परिसरामुळे आम्हा मानवांची जीवन पध्द्ती कशी निश्चीत होईल हे स्पष्ट केले जाते.
- पण आज मानव स्वतःच्या स्वार्थासाठी तुझ्याशी नीट वागत नाही. त्याच्या वेगवेगळ्या प्रकल्पामुळे तुझी दमछाक होते आणि नैसर्गिक गोष्टींवर त्यांचा परिणाम होतो. म्हणजे शेवटी तुझ्यावरच घाव घालतो.
- मानवाच्या बेजबाबदार वागण्याने तुझ्यात अफाट बदल होतात आणि त्या सर्वांची झळ शेवटी मानव व साऱ्या सजीवांना भोगावी लागते.
तुझे संतूलन राखण्यासाठी मानवाने सखोल विचार करायला हवा कारण साऱ्या सजीवांचे जगणे मरणे हे तुझ्यावरच आहे. मानवाला स्वतः पुरता विचार न करता निसर्गातील प्रत्येक घटकांचा विचार करून त्यांचे संगोपन करायला हवे. तसे केल तरच तुझे संतूलन राहिल व तुझे रक्षण होईल. तुझे संवर्धन करणे मी माझे कर्तव्य समजते आणि मी नेहमी तुझ्याच सांगाती असेन.
- कुणी तुला अपाय करत असेल तरी सांभाळून घे. तूझं संतूलन खूप महत्त्वाचे आहे आणि तुझ्यावरच आम्ही सारे सजीव अवलंबून आहोत. काळजी घे.
- कळावे,
- लोभ असावा.
- तुझी रक्षणार्थी,
- शोभा वागळे
- मुंबई
- 8850466717