Skip to content
ग्रामपंचायतच्या मुख्य आवारात
दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांच्या
उच्च रक्तदाबाचा त्रास झालागत
घुसमटतेय गेली कित्येक वर्ष घरकुलाचे स्वप्न..
कधी पात्र लाभार्थ्यांचे निकष अपुरे पडतात,
तर कधी याला त्याला द्यायची हिरवी नोट नसल्याने,
गाळल्या जाते नाव अगदी शेवटच्या क्षणी
बापाच्या कित्येक टायवरी चपला
ग्रामपंचायतच्या पायऱ्या घासून-घासून
बठ्ठर झाल्या त्याचं त्यालाच माहीत…
कधी चुकून भुलून आलच एकदाचं नाव
तर जीवनातल्या चार आश्रमासारखे
दिसायला लागतात डोळ्यापुढे चार चेक
अन् सुरू होते त्याची धडपड
मातीतुन, कुडातून, धुरड्यातून
पहिला चेक हातात येण्या आधीच
कारकूनापासून ते साहेबापर्यंत
अन् तिथुनच बापाच्या स्वप्नांचे
बाप नाइलाजाने हो म्हणावं लागतं
पुन्हा व्याजावर पैसे घेतांना
मग आपली स्वप्नेही कसे झाकल्या जातील ?
तेही खुलेआम धुळ खात बसलेय उघड्यावरच…
मुद्दल तर तसेच ढिम्म दगडासारखं…
Like this:
Like Loading...
Related