- पुर्वजांनी निर्माण केलेला
- ऐतिहासिक वारसा ध्दव्स्त करत
- त्यांनी त्यांच बस्तान मांडलं
- नी इतिहासाचे विद्रुपिकरण करून
- आमच्यावर गुलामगिरी लादली
- तेव्हापासून आजतागायत
- आम्ही लढत आहोत माणुसकीचे युध्द
- ज्यात आमच्या कित्येक पिढ्या गारद झाल्या …..
Contents
hide
- वास्तवतः संशोधनाअंती सिध्द झाल्यावरही
- आम्ही कुठल्याच बाबिंवर केला नाही दावा
- वा धर्मांध होऊन उतरलो नाही रस्त्यावर
- कारण रोहिणीच्या पाण्यावरून पेटलेल्या
- युध्दाला शमवण्यासाठी
- राजपाटाचा त्याग करणाऱ्या
- सम्यक सम्बुध्दाचे आम्ही उपासक आहोत
- आम्हांला आजही नको आहे धर्मयुध्द
- युध्दाने सुटणार नाहीत कुठलेही मुलभूत प्रश्न
- यावर आम्ही ठाम आहोत ……
<
- खरं तर ….
- आजही आमच्या पाठीचे कणे ताठ आहेत
- नी लढण्याची उर्जा आणि उर्मी कायम आहे
- पण कशासाठी लढावं?
- याचे भान आमच्यात आले आहे
- उठसूठ रस्त्यावर उतरून
- माणसांना वेठीस धरणे आम्हांला मान्य नाही
- पण वेळ आलीच तर
- एकदाच लढू आरपारचे युध्द
- तोवर तुम्ही गर्जत राहा
- आम्ही आमचे शस्ञ परजतो …….
- गड्यांनो ……,
- तृष्णेने खवळलेल्या सागरात
- सापडत नाहीत करूणेचे मोती
- एवढं कळलं की
- सारेच पोळलेले निळ्या बेटावर जमा होतील
- नी एका सुरात निळ्या नभाचे गीत गातील …….
- -गणेश लांडगे
- (साभार फेसबुक)