Contents
hide
- लोकशाहीच्या देशात
- कायद्याचं राज्य असावं
- एखाद्याचा विरोधही
- नियमाला धरून करावं
- दगड गोटे लाठी काठी
- यांना कुठेच नसावं स्थान
- न्यायदेवतेच्या दरबारात
- उठवलंच पाहिजे रान
- एकोप्याने नांदावयाचा
- आम्ही केला पाहिजे प्रण
- मनामनात वाढूच नये
- द्वेष मत्सर कलहांचे तण
- जाती धर्माच्या विद्वेषाचे
- मर्यादित वाजवावे ढोल
- संभाषणातून कोणाच्या
- जाणार नाही बघा तोल
- एकामेकांच्या हातावर
- द्यावी एकतेची टाळी
- खाली मान घालायची
- मग येणार नाही पाळी
- बघा सल्ला पटतो का
- प्राधान्य देशाच्या हिताला
- सारेच मिळून गाऊयात
- देशात एकतेच्या गीताला
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१