अमरावती/डॉ. नरेश इंगळे
विद्यापीठ व महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकांची रजिस्टर संघटना ACUSAT असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर ॲनिमेटेड टीचर्स महाराष्ट्र तर्फे अमरावती विभागाची २०२४ ते २०२९ पर्यंतची कार्यकारीणी केंद्रीय अध्यक्ष डॉ एम. ए. वाहुळ (माजी उपसंचालक उच्चशिक्षण) व केंद्रीय सचिव डॉ जे. एम. मंत्री यांनी नुकतीच जाहीर केली आहे.कार्यकारिणी मध्ये मार्गदर्शक म्हणून डॉ.व्ही.एम. जामोदे (माजी प्रकुलगुरू) अध्यक्षपदी डॉ.ए डब्ल्यू राऊत (माजी सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था), सचिव पदी डॉ.पी.डब्ल्यू. देवतारे,उपाध्यक्षपदी एस.आर. अमरावतीकर (अकोला) कोषाध्यक्षपदी डॉ. एच. एस लुंगे, सहसचिवपदी डॉ .ए. एम. अविनाशे व कार्यकारणी सदस्य म्हणून डॉ व्हीं जी ठाकरे (माजी प्राचार्य व सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था) डॉ डब्ल्यू. एस. बरडे (अमरावती जिल्हा प्रभारी) डॉ.जी. टी. पाटील (यवतमाळ जिल्हा प्रभारी) डॉ. ए. एम गारोडे (बुलढाणा जिल्हा प्रभारी), डॉ.आय .ए.राजा (अकोला जिल्हा प्रभारी), डॉ. एच.व्ही वंजारी (वाशिम जिल्हा प्रभारी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
सन २००९ ला स्थापन झालेल्या या असोसिएशन मध्ये अंदाजे ४००० च्या वर निवृत्त झालेले प्राध्यापक आजीवन सभासद आहेत. व या संघटनेमार्फत निवृत्तीनंतरचे प्राध्यापकाचे बरेचसे प्रश्न शासन दरबारी व उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सोडणुक करून एकूण ३२ पैकी २९ प्रकरणांमध्ये न्याय मिळवून देण्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विक्रम नोंदविला गेला आहे. अजूनही चार प्रकरणे न्यायप्रविष्ठ असून एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा प्रविष्ट आहे. संघटनेचे केंद्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर स्थित असून महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, नांदेड, जळगाव, छत्रपती संभाजी नगर,पुणे-नाशिक व कोल्हापूर या विभागाच्या स्वतंत्र कार्यकारिणी घोषित केल्या असल्याची माहिती केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रकाश देवतारे यांनी दिली आहे. इच्छुक निवृत्त प्राध्यापकानी नोंदणी संदर्भात डॉ. प्रकाश देवतारे यांचेशी ९४२३६२२२८५ संपर्क साधावा.