गौरव प्रकाशन शेगाव (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशचे राज्यस्तरीय अधिवेशन शेगाव दिनांक 17 फेब्रुवारी 2025 आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान या एक दिवशीय अधिवेशनामधील कार्यक्रम पत्रिका अशी, सकाळी १०.०० वाजता. संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तसेच मुख्य अधिवेशनला १२.१५ वाजता प्रारंभ होईल दरम्यान कार्यक्रमाचे स्थळी आल्यानंतर सभासदांनी आपल्या आगमनाची नोंद स्वागत कक्षात करणे आवश्यक आहे.आचार्य बाळशास्त्री जांभेकर व सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल.
● हे वाचा – दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी
मान्यवरांचे स्वागत समारंभ समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रास्तविक राज्यसचिव सुभाष लहाने हे करतील. पहिल्या सत्राचे औपचारिक उद्घघाटन मा.मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव मा.श्री विद्याधर महालेजी यांचे शुभहस्ते होणार आहे. तसेच उद्घघाटनपर मुख्य भाषण होईल यानंतर सुमित कुलकर्णी, भिका भाऊ चौधरी, गोरख तावरे, ओम प्रकाश शिंदे, प्रवीण पाटील, आप्पासाहेब पाटील मार्गदर्शन करतील. तसेच प्रमुख पाहुणे डॉ. मा.श्री.सुकेश झंवरजी यांच्या मार्गदर्शक पण भाषणानंतर अध्यक्षीय समारोपाचे भाषण संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्ण करणार आहेत.
दुसरे सत्रात संघटना वाढीबाबत विभागीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांचेशी संवाद साधला जाणार आहे. दर दोन महिन्याला विभागीय स्तरावर संघटनेची बैठक यासाठी संघटनेच्या विभागीय अध्यक्षांनी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे याकरीता नियोजन करण्यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे त्याचबरोबर संघटनेचे विविध प्रश्न, मागण्या, समस्या व अडचणीबाबत ठराव करण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे राज्य सचिव सुभाष लहाने यांनी दिली.
अधिक माहितीसाठी राज्यसचिव सुभाष लहाने (9422184494) अमरावती विभागीय अध्यक्ष रवींद्र वाघ (9545214842), बुलढाणा जिल्हाध्यक्ष शौकत शहा (80877110097) यांच्याशी संपर्क साधावा.