गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी): सुर सप्तक म्युझिक ट्रस्ट आणि बाबाज थिएटर्स नाशिक आयोजित स्वर गोविंद या शास्त्रीय संगीताच्या मैफलीत प्रथम पुष्प डॉ जस्मीत कौर यांनी गुंफले. त्यांनी राग पुरिया सादर केला. यानंतर राग जनसंमोहीनी सादर केला. शेवटी देवाचिया द्वारी हा अभंग सादर केला.
यानंतर पंडित विश्वनाथ कान्हेरे यांनी एकल संवादिनी वादन केले. आपल्या जादूई वादनाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प श्री विनायक हेगडे यांनी गुंफले. त्यांनी राग जोगकौंस मध्ये विलंबित एकतालात पारंपरिक सुघर बरपा हा खयाल सादर केला त्याची जोड म्हणून तीन तालामध्ये पीर पराई ही बंदिश सादर केली.
कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ कलाकार पंडित जयंत नाईक आणि पंडित शंकरराव वैरागकर यांचा सत्कार करण्यात आला.
मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबाज थिएटर्स चे प्रशांत जुन्नरे तसेच सुर सप्तक संस्थेचे गुरशांत सिंह तसेच अरुण साठे यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रसाद गोखले यांनी केले.
हे वाचा – पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’-नंगारा म्युझियम