महादेवराव ताटके : ग्रामविकासाचे पथदर्शक

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

महादेवराव ताटके हे एक मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व समाजसुधारक, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. ते वाशीम जिल्ह्यातील आमगव्हण, येथील रहिवासी होते. त्यांनी मुंबईत आपली कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वताच्या प्रचंड मेहनतीने आपल्या बांधकाम व्यवसायात चांगला जम बसविला त्यानंतर त्यांना समाजसेवेची ओढ लागली.

महादेवराव ताटके यांचा जन्म वाशीम जिल्यातील आमगव्हण गावात झाला. त्यांचे प्रारंभिक जीवन एक साधे होते, पण त्यांच्या मनात नेहमीच समाजातील दीनदुबळ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यांनी आपल्या जीवनाची दिशा समाजसेवा क्षेत्राकडे वळवली. जसे की चिकनगुनिया साठी फिरता दवाखाना, सामुहिक  विवाह मेळावे, विद्यार्थी प्रशिक्षण, धम्म शिबिरे, भंतेजींना आणि बुद्ध विहारांना मोठ्या प्रमाणात दान, सामाजिक प्रबोधनात्मक मोठमोठे गायनाचे कार्यक्रम, गावातील मंडळींना अडचणीच्या वेळी दिलासा, राजकीय आणि सामाजिक चळवळीत सहभाग यासारखे सामाजिक कार्य निस्वार्थपणे कार्य केले. आपल्या मुळगावाकडे त्यांच्या कार्यामुळे त्या भागात अनेक सामाजिक बदल घडविले.

महादेवराव ताटके हे समाजाच्या वंचित आणि मागासलेल्या घटकांसाठी नेहमीच वचनबद्ध होते. त्यांनी आपल्या कार्यात जातीभेद, पंथभेद आणि वर्गभेद यांना तिलांजली दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक समाज सुधारणा घडवून आणल्या गेल्या. त्यांनी त्यांच्या कार्याची सामाजिक सेवेने केली, ज्यामुळे स्थानिक समाजाच्या वंचित आणि मागासलेल्या घटकांना न्याय मिळेल. त्यांचा विश्वास होता की शिक्षणच समाजात खरे बदल घडवू शकतो.

महादेवराव ताटके यांनी राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला. ते समाजवादी दृष्टिकोनाचे होते आणि त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत कधीही श्रीमंत आणि गरीब यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजाच्या वंचित आणि मागासलेल्या घटकांसाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सन २००९ साली विधानसभा निवडणूक लढविली मात्र त्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. स्वतःच्या जिद्दीनं ‘त्यांनी’ कमावलं ऐश्वर्य, राजकारणाचा नाद लागला अन् सर्व संपल.! साहजिकच त्यातून त्यांना सावरता आले नाही. या निवडणुकीत स्वतः जवळील मेहनतीने जमविलेले सर्व पैसे खर्च झाल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला यातच मुंबईतील घरदार विकून त्यांनी देणेकरांची देणी दिलीत. मागील काही दिवसात ते फारच आर्थिक अडचणीत होते. राजकारणात अपयश आलं की राजाचं रंक कसा होतो?  त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाशिमचे महादेवराव ताटके… राजकारणापायी  कोट्यवधीच्या संपत्तीचा कचरा झाला आणि ते रस्त्यावर आले…

महादेवराव ताटके यांचे योगदान मुख्यतः दोन गोष्टींमध्ये महत्त्वाचे आहे शिक्षण आणि समाज सुधारणा. त्यांच्या कार्यामुळे अनेक लोकांना नवचेतना मिळाली आणि समाजाच्या सर्व स्तरांमध्ये समानतेच्या विचारांची रुंदी झाली. महादेवराव ताटके हे एका आदर्श समाजसेवकाचे प्रतीक होते. त्यांनी आपले जीवन सर्वांच्या भल्यासाठी समर्पित केले. त्यांच्या कार्यामुळे त्यांचा प्रभाव वाशीम जिल्ह्यात आमगव्हण व परिसरात दिसून येतो. त्यांच्या कार्याची महत्त्वाची शिकवण अशी की, एक व्यक्ती देखील आपल्या समाजाच्या भवितव्यासाठी मोठा बदल घडवू शकतो. काल दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी त्यांचे नुकतेच दु:खद निधन झाले ही बातमी ऐकताच सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसली. महादेवराव ताटके यांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला या दुखातून त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याचे बळ मिळो. त्यांच्या निधनामुळे समाजात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

बंडूकुमार धवणे

अमरावती

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

2 thoughts on “महादेवराव ताटके : ग्रामविकासाचे पथदर्शक”

  1. सविनय जय भीम !!.. माझ्या विनंतीला मान देऊन आपण कालकथित आदरणीय महादेवरावजी ताटके साहेब यांच्या जीवनावर खूप छान लेख लिहिला. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.

    Reply
  2. चुकीच्या लोकांच्या नादी लागून माणूस कसा देशोधडीला लागतो याचे मूर्तिमंत ऊदाहरण म्हणजे महादेव ताटके.अनुभव नसताना राजकारणात केवळ पैशाच्या बळावर यशस्वी होता येत नाही.सभोवताल जर लुटारू लोक असतील तर कुबेर देखील कंगाल होतो.याच मूर्तिमंत उदाहरण हे महादेव ताटके कडे बघून वाटत.

    Reply

Leave a comment