जांभई देणे संसर्गजन्य का असते?

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

आपण अनेकदा पाहतो की, जर आपल्या शेजारील कोणी जांभई दिली तर आपल्यालाही जांभई यायला लागते. कधी-कधी फक्त जांभईबद्दल ऐकले किंवा वाचले तरी आपण जांभई देतो. ही गोष्ट खूप सामान्य असली तरी ती आपल्याला गमतीशीर वाटते. पण यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. जांभई देण्याचे मुख्य काम म्हणजे आपला मेंदू ताजा ठेवणे. जेव्हा आपला मेंदू थकल्यासारखा किंवा जड वाटतो, तेव्हा आपण मोठा श्वास घेतो, म्हणजेच जांभई देतो. यामुळे जास्त ऑक्सिजन शरीरात जातो आणि मेंदूला थंडावा मिळतो.

जांभई देणे संसर्गजन्य का असते? हे समजून घेण्यासाठी मानसशास्त्र आणि मेंदूच्या कार्यप्रणालीचा अभ्यास महत्त्वाचा आहे. आपल्या मेंदूमध्ये “मिरर न्यूरॉन्स” नावाचे विशेष पेशी असतात. या पेशी इतर लोकांचे वर्तन आपल्यामध्ये नकल करण्यास मदत करतात. जसे आपण एखाद्याला हसताना पाहतो आणि आपल्यालाही हसू येते, तसेच एखाद्याला जांभई देताना पाहिले की आपल्यालाही जांभई येते.

जांभई देणे हे एक प्रकारचे “सामाजिक संकेत” आहे. यामुळे लोकांमध्ये एक प्रकारची जोडणी निर्माण होते. एका गटात एक जण जांभई दिली तर इतरांनाही ती होण्याची शक्यता असते. जांभई देण्याचा संकेत आपल्या मेंदूत खूप वेगाने पोहोचतो. आपण फक्त जांभई देणाऱ्या व्यक्तीकडे पाहिले तरी आपला मेंदू त्याला प्रतिसाद देतो, आणि आपल्याला जांभई येते.माणसांप्रमाणेच काही प्राणी, जसे कुत्रे, चिंपांझी, आणि डॉल्फिन्स, यांनाही जांभई संसर्ग होतो. यावरून असे दिसते की जांभई संसर्ग हा सहानुभूतीशी जोडलेला आहे. ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना जांभई संसर्ग सहसा होत नाही, कारण त्यांच्यात सहानुभूतीची भावना पूर्णपणे विकसित झालेली नसते.

जांभई संसर्ग होण्याचा आपल्यातील सहानुभूतीच्या पातळीशी थेट संबंध आहे. ज्यांना इतरांच्या भावना लवकर कळतात, त्यांना जांभई संसर्ग लवकर होतो. फक्त पाहिल्यासच नव्हे, तर जांभईचा विचार केल्यावरही अनेकांना जांभई येते. जांभई देणे हे फक्त थकवा किंवा कंटाळा दाखवण्यापुरते मर्यादित नाही. यामागे आपल्या मेंदूची आणि शरीराची कार्यप्रणाली असते. जांभई देण्याचा संसर्ग म्हणजे मेंदूतील सहानुभूती आणि सामाजिक जोडणीचे एक अद्भुत उदाहरण आहे. तर, पुढच्या वेळी जर तुम्ही जांभई दिली तर लक्ष ठेवा, ती संसर्गजन्य आहे, आणि लवकरच तुमच्या शेजारील व्यक्तीलाही जांभई येईल.!

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

1 thought on “जांभई देणे संसर्गजन्य का असते?”

  1. अतिशय छान माहिती दिली आहे. जांभाई हा प्रकार असाच आहे. समोरच्या व्यक्तीला आली की दुसरा लगेच जांभाई देतो.

    Reply

Leave a comment